Join WhatsApp group

Ads

अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक गजानन तायडे यांच्या सामाजिक विचारांचा वटवृक्ष; ‘तीक्ष्णगत’ संस्थेतून गरजू बालकांना अन्नधान्याची मदत

By Sarkar Maza

August 2, 2026 6:11 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जयंती रॅलीच्या उपक्रमाने आज जिल्हाभरात मोठे सामाजिक स्वरूप धारण केले असून, यंदाच्या जयंतीत झालेला जनसहभाग हा त्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

गजानन तायडे यांनी जयंतीला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता समाजप्रबोधन, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वामुळे अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे.

तीक्ष्णगत’ संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य

गजानन तायडे हे ‘तीक्ष्णगत’ या सामाजिक संस्थेशी जोडलेले असून, संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. या संस्थेचे संस्थापक डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रेरणेने शिक्षण, सामाजिक जाणीव आणि गरजू घटकांना मदत करण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगितले जाते.

गरजू मुलांना अन्नधान्याची मदत

जयंती सोहळ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने उपस्थितांचे लक्ष वेधले. रस्त्यावर भेटलेल्या काही गरजू मुलांनी आर्थिक मदतीऐवजी, “भाऊ, आम्हाला पीठ आणि तेल घेऊन द्या,” अशी विनंती केली. ही बाब लक्षात घेत गजानन तायडे यांनी तातडीने त्या मुलांना पीठ, तेल तसेच आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून दिले. या उपक्रमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना गजानन तायडे म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला समतेचा संदेश आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आम्हाला सतत मार्गदर्शक ठरते. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली आहे.”जयंतीच्या निमित्ताने झालेल्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, समाजकारणाला मानवतेची जोड देणारा हा उपक्रम म्हणून त्याची चर्चा होत आहे.

Related Article

मुर्तिजापूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; ११,८४६ प्रकरणांवर कार्यवाही, ८२० प्रमाणपत्रांचे वितरण

“अवैध धंद्यांवरून राजकीय रस्सीखेच? चर्चांनी तापले मुर्तिजापूर!”

“महापुरुषांचा सन्मान की राजकीय अहंकार? अण्णा भाऊ साठे चौकावरील वादाने उघडे पाडले समाज फोडण्याचे राजकारण!”

सण, संस्कृती आणि गंजी-पत्त्यांचा खेळ; प्रशासनाची भूमिका काय?

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा जुगार अड्ड्यांना उधाण? सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेच्या चर्चेने खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी

माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!