Join WhatsApp group

Ads

-

सण, संस्कृती आणि गंजी-पत्त्यांचा खेळ; प्रशासनाची भूमिका काय?

By Sarkar Maza

August 1, 2026 9:23 am

Ads

श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्री यांसारखे मोठे सण आता जवळ आले आहेत. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात विविध उत्सव मंडळे कार्यरत आहेत. यापैकी काही मंडळे स्थानिक राजकीय कार्यकर्ते किंवा नेत्यांशी संबंधित म्हणून ओळखली जातात.

दरम्यान, शहरात अशी चर्चा रंगू लागली आहे की काही ठिकाणी उत्सवांच्या खर्चासाठी किंवा सामाजिक उपक्रमांसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा ‘गंजी’ आणि पत्त्यांच्या खेळांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. या चर्चांची सत्यता संबंधित यंत्रणांनी पडताळणे आवश्यक आहे.

सामाजिक कार्यासाठी निधी उभारणे हा उद्देश असला, तरी त्यासाठी कायदेशीर आणि पारदर्शक मार्ग उपलब्ध असताना वादग्रस्त किंवा कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या पद्धतींचा अवलंब केला जाणार का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रशासना समोर उभा राहतो—जर अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यासाठी परवानगी मागितली गेली, तर प्रशासन ती देणार का? आणि परवानगी नसेल, तर बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी पोलीस व संबंधित विभाग कोणती ठोस पावले उचलणार?

सण हे श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे उत्सवांच्या नावाखाली कोणतेही बेकायदेशीर किंवा वादग्रस्त प्रकार घडू नयेत, याची जबाबदारी आयोजकांसह प्रशासनाचीही आहे. नागरिकांची अपेक्षा आहे की सणांची पवित्रता अबाधित राहावी आणि कायद्याचे समान पालन व्हावे.

Related Article

“महापुरुषांचा सन्मान की राजकीय अहंकार? अण्णा भाऊ साठे चौकावरील वादाने उघडे पाडले समाज फोडण्याचे राजकारण!”

सण, संस्कृती आणि गंजी-पत्त्यांचा खेळ; प्रशासनाची भूमिका काय?

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा जुगार अड्ड्यांना उधाण? सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेच्या चर्चेने खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी

माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.

शाळेच्या पवित्र परिसरात जुगाराचा अड्डा? तेल्हारा नगर परिषद शाळा क्रमांक १ बाबत गंभीर चर्चा

अखेर बार्शीटाकळीमध्ये उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा! शासनाची ना-हरकत; आमदार हरीश पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!