Join WhatsApp group

Ads

--

शाळेच्या पवित्र परिसरात जुगाराचा अड्डा? तेल्हारा नगर परिषद शाळा क्रमांक १ बाबत गंभीर चर्चा

By Sarkar Maza

July 30, 2026 4:00 pm

Ads

तेल्हारा प्रतिनिधी : शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र, तेल्हारा येथील नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये दररोज सायंकाळी ‘तितली-भवरा’ तसेच इतर जुगाराचे खेळ सुरू असल्याच्या दावा परिसरात होत असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शाळा सुटल्या वर दुसरीच शाळा भरते असे चित्र दररोज दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर या ठिकाणी प्रत्यक्षात जुगाराचे खेळ सुरू असतील, तर हा केवळ कायद्याचा भंग नसून शिक्षण व्यवस्थेलाही काळिमा फासणारा गंभीर प्रकार ठरू शकतो.

ज्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि नैतिकतेचे धडे दिले जातात, त्याच परिसरात जुगारासारख्या बेकायदेशीर प्रकारांचे चित्र अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

प्रश्न असा निर्माण होतो की, स्थानिक पोलिस प्रशासनाला या प्रकाराची माहिती नाही का? की माहिती असूनही कारवाई होत नाही?

रोज सायंकाळी लोकांची गर्दी होत असल्यास, त्या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांचे याकडे लक्ष का गेले नाही?

कायद्याचे राज्य असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनासाठी हा गंभीर प्रश्न आहे.

जुगार हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.

अशा प्रकारांना वेळेत आळा घातला नाही, तर युवक आणि अल्पवयीन मुलांवर त्याचे विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. शाळेच्या परिसरात अशा घटना घडत असतील, तर भविष्यात विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होण्याचा धोका नाकारता येणार नाही. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच शाळेच्या परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवून अशा बेकायदेशीर प्रकारांना कायमचा आळा घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.टीप: वरील बाबी स्थानिक स्तरावर होत असलेल्या चर्चांवर आधारित आहेत. संबंधित पोलिस प्रशासन व नगर परिषद यांनी वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

फोटो – Ai Genrated

Related Article

अखेर बार्शीटाकळीमध्ये उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा! शासनाची ना-हरकत; आमदार हरीश पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश

13 वर्षांपासून एकाच खुर्चीवर ठाण! मुर्तिजापूरचे विस्तार अधिकारी व्ही. डी. किर्तने वादाच्या भोवऱ्यात. त्याचे मागील गुपित काय?

फुकटच्या शासकीय ई-क्लास जमिनीवर डोळा, कायद्याचा गैरवापर आणि गावातील राजकारण; निंबा गाव नेमके कुठे चालले आहे?

स्मार्ट मीटर की स्मार्ट मनमानी? ग्राहकांचा विश्वास जिंकणार की संताप वाढवणार?

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यात पुन्हा ‘दरबारां’ची गर्दी; श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन?रेपारखेळ परिसरातील काही दरबारांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

जोशी साहेबांचा जोश हाय! ऑपरेशन प्रहारचा धडाका; अवैध हत्यारे, दारू तस्करीवर कारवाई आणि चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!