Join WhatsApp group

Ads

-

“अवैध धंद्यांवरून राजकीय रस्सीखेच? चर्चांनी तापले मुर्तिजापूर!”

By Sarkar Maza

August 2, 2026 2:09 am

Ads

मुर्तिजापूर शहरात सध्या अवैध धंद्यांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. शहरात वरली मटका, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. मात्र या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, एका नगरसेवकाच्या नावाशी पूर्वी जोडल्या गेलेल्या कथित अवैध व्यवसायांवर माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संबंधित व्यवसाय दुसऱ्याच्या नावाने सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यालाही यश आले नाही, अशी चर्चा शहरात ऐकायला मिळते. या चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, एका नगरसेवकाच्या नावाशी पूर्वी जोडल्या गेलेल्या कथित अवैध व्यवसायांवर माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संबंधित व्यवसाय दुसऱ्याच्या नावाने सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यालाही यश आले नाही, अशी चर्चा शहरात ऐकायला मिळते. या चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

आता आणखी एक चर्चा शहरभर पसरत आहे. जर संबंधित गटाला किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना कथित “परमिशन” मिळाली नाही, तर शहरात इतर कोणाचाही अवैध व्यवसाय सुरू होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

मात्र येथे सर्वात मोठा प्रश्न वेगळाच आहे. अवैध धंद्यांसाठी “परमिशन” हा शब्दच चर्चेत का येतो? कायद्याच्या चौकटीत कोणत्याही बेकायदेशीर व्यवसायाला परवानगी असू शकत नाही. त्यामुळे अशा चर्चा नागरिकांच्या मनात प्रशासनाबाबत संशय निर्माण करतात.

सध्या या वादाचा कोणताही अधिकृत निकाल समोर आलेला नसल्याची चर्चा असून, काही संबंधित घटकांनी आपला मोर्चा परमिशन साठी मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वळवल्याचेही बोलले जात आहे. यामध्ये तथ्य असल्यास योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे; आणि जर या केवळ अफवा असतील, तर त्या तातडीने खोडून काढणे तितकेच महत्त्वाचे आहे.

दरम्यान, शहरात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू असल्या तरी एक बाब अनेक नागरिकांकडून अधोरेखित केली जाते. मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जोशी साहेब यांनी आजपर्यंत कायद्याची भूमिका कायम ठेवत राजकीय दबावाला बळी न पडता अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतात.

तसेच ग्रामीण पोलीस चे ठाणेदार यांना आपल्या चेंबर मध्ये या अवैध धंद्यावाल्याना चहापाणी करनार का? आज हे स्पष्ट होणार आहे.

कायद्याचे राज्य हे व्यक्ती, पक्ष किंवा प्रभावावर चालत नाही; ते संविधान आणि कायद्यावर चालते. त्यामुळे अवैध धंदे कोणाचेही असोत, त्यांच्यावर समान निकषांवर कारवाई झाली पाहिजे. जर शहरात “परमिशन”च्या चर्चाच सुरू राहिल्या, तर त्या कायद्यावरील विश्वासाला धक्का पोहोचवू शकतात.

मुर्तिजापूरला अफवांचे राजकारण नको, तर कायद्याचा धाक हवा. प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेत नागरिकांमधील संभ्रम दूर करावा आणि कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाला थारा दिला जाणार नाही, हा संदेश ठामपणे द्यावा. हाच समाजहिताचा आणि कायद्याच्या राज्याचा खरा विजय ठरेल.

Related Article

मुर्तिजापूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; ११,८४६ प्रकरणांवर कार्यवाही, ८२० प्रमाणपत्रांचे वितरण

“अवैध धंद्यांवरून राजकीय रस्सीखेच? चर्चांनी तापले मुर्तिजापूर!”

“महापुरुषांचा सन्मान की राजकीय अहंकार? अण्णा भाऊ साठे चौकावरील वादाने उघडे पाडले समाज फोडण्याचे राजकारण!”

सण, संस्कृती आणि गंजी-पत्त्यांचा खेळ; प्रशासनाची भूमिका काय?

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा जुगार अड्ड्यांना उधाण? सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेच्या चर्चेने खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी

माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!