Join WhatsApp group

Ads

-

मेन रोडवरील अवैध बांधकामामुळे पाणी तुंबण्याची भीती

By Sarkar Maza

June 22, 2026 11:28 am

Ads

मुर्तिजापूर, दि. २२ : शहरातील मेन रोड परिसरातील सार्वजनिक नाल्यावर अवैधरित्या बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत एका नागरिकाने मुर्तिजापूर नगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या अवैध बांधकामामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा बाधित होऊन सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जुनी वस्ती, लकडगंज येथील रहिवासी व व्यापारी गणेशअप्पा बसवेश्वर अप्पा पिंपळे यांनी मुख्याधिकारी, मुर्तिजापूर नगरपालिकेकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील मेन रोडवरील सार्वजनिक नाल्यावर मिश्रीलाल विश्वनाथ महाजन यांनी नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू केले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित नाल्यामधून शहरातील पावसाचे पाणी वाहून जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने नाल्यावरील हे बांधकाम कायम राहिल्यास पाण्याचा निचरा अडथळित होऊन परिसरात पाणी साचण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे अर्जदाराने नमूद केले आहे.याशिवाय, सुरू असलेल्या बांधकामामुळे आपल्या घराकडे जाणारा रस्ताही पूर्णपणे बंद झाल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. या संदर्भात अवैध बांधकामाचे छायाचित्रही तक्रारीसोबत सादर करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित बांधकामावर कारवाई करून ते हटविण्यात यावे, अशी मागणी अर्जदाराने केली आहे.

या तक्रारीची प्रत आमदार हरीश पिंपळे आणि नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनाही देण्यात आली आहे.नगरपालिका प्रशासन या तक्रारीची चौकशी करून कोणती कारवाई करते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!