Join WhatsApp group

Ads

-

अकोला जिल्हा प्रशासनाचा राष्ट्रीय सन्मान; ‘ई-भूमिती’ला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय सन्मान

By Sarkar Maza

June 20, 2026 7:47 pm

Ads

अकोला, दि. २० : अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ‘ई-भूमिती – मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स’ या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित 108 व्या स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्लीतील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ऑगस्ट क्रांती मार्ग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो.

अकोला जिल्हा प्रशासनाचा ‘ई-भूमिती’ हा प्रकल्प जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचे जीआयएस (GIS) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रणालीमध्ये शाळा, अंगणवाडी केंद्रे, रेशन दुकाने, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्रे, शासकीय कार्यालये तसेच विविध सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे प्रशासनाला विकासकामांचे नियोजन, संसाधनांचे व्यवस्थापन, सेवा वितरण आणि निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.तसेच

तसेच डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळून प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होत असून नागरिकांनाही अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होत आहेत.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन करत, हा पुरस्कार संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!