Join WhatsApp group

Ads

-

रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून निषेध

By Sarkar Maza

June 18, 2026 9:02 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा येथे रविकांत भाऊ तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवित अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

शेतकरी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतीमालाला योग्य भाव, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून सरसकट कर्जमाफी हा एकमेव दिलासा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी सुरेश जोगळे, चंद्रशेखर गवळी, अरविंद तायडे, गुलाबराव म्हसाये पाटील, शुभम जंजाळ, पंकज वानखेडे, रमेश चिंचे, विलास देशमुख, रामहरी आगळे, इलियास पठाण, शेख मोशिम, कुणाल राठोड, रियाज खान, राजीव सेवारकर, शिशिर गांजाळे, संतोष रुद्रकर, योगेश सोळंके, बाळासाहेब खांडेकर, अनिल गावंडे, नंदकिशोर, निलेश गुल्हाने, प्रवीण चारहाटे, अमोल तांबडे, अमर ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व अरविंद तायडे (शेतकरी संघटना), शुभम जंजाळ (क्रांतिकारी शेतकरी संघटना) आणि गुलाबराव म्हसाये पाटील यांनी केले.

आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने सरसकट कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!