दि.०२ : श्याम ठक : बार्शीटाकळी:तालुक्यातून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे फाटक बंद राहणार.बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावरील अभियंता यांनी दिलेल्या माहितनुसार दुरूस्ती व देखभाल कामासाठी दि.03 जानेवारी २०२४च्या रात्री 10 वाजेपासून ते दी.05जानेवारी २०२४ च्या सकाळी 5 वाजेपर्यंत. बार्शीटाकळी- अकोला रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद राहिलं.
त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. बदल सुचविलेला मार्ग खालिल प्रमाणे.अकोला ते मंगरूळपीर व मंगरूळपीर ते अकोला जाण्यासाठी – येण्यासाठी,बार्शीटाकळी अकोला व्हाया कापशी किंवा बार्शीटाकळी ते अकोला व्हाया पिंपळखुटा, विझोरा, कान्हेरी (सरप )याप्रमाणे राहणार असल्याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
महत्वाची सूचना
वाहतुकीच्या मार्गातील बदल अकोला ते मंगरूळपीर व मंगरूळपीर ते अकोला जाण्यासाठी – येण्यासाठीबार्शीटाकळी अकोला व्हाया कापशी किंवा बार्शीटाकळी ते अकोला व्हाया पिंपळखुटा, विझोरा, कान्हेरी (सरप )
