Join WhatsApp group

वंचितनंतर उद्धव सेनेचा पदाधिकारी भाजपमध्ये; कुरणखेड सर्कलमध्ये भाजप मारणार का बाजी?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुरणखेड सर्कल राजकीयदृष्ट्या गजबजले आहे. खासदार आणि आमदार या दोघांचेही मूळ गाव या सर्कलमध्ये असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या भागाकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अलीकडेच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर वंचित बहुजन आघाडीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्कलमध्ये भाजपने मोठा डाव खेळला आहे. वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती पती सुशांत पाटील बोर्डे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे वंचितला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही धक्का बसला आहे. पळसो बढे गावचे शिवसेना शाखाप्रमुख मोहन बोर्डे यांनी १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, तसेच ज्येष्ठ नेते अण्णा उमाळे प्रमुख उपस्थित होते. भाजपा कुरणखेड मंडळाध्यक्ष प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, भाजपा तालुका सरचिटणीस अमन महल्ले, किरण उमाळे, श्रीराम बोळे, दिलीप बोळे, निवृत्ती बोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या दुहेरी पक्षप्रवेशामुळे भाजप आणखी मजबूत झाली असून, वंचित आणि उद्धव सेनेच्या गडात भाजपने यावेळी ‘मोठी बाजी मारण्याची’ तयारी दाखवली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत “शंभर टक्के विजय मिळवू” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कुरणखेड सर्कलमधील राजकीय समीकरणांमध्ये नवा बदल घडताना दिसत आहे.

बातमी – योगेश विजयकर


Share

Leave a Comment

error: Content is protected !!