Join WhatsApp group

Ads

देवयानी भुयार हिची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

By Sarkarmzanews

November 7, 2025 9:36 pm

Ads


अमरावती : दिनांक ३० ऑक्टोबर २५ रोजी अमरावती जिल्हा क्रीडांगण येथे पार पडलेल्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व अकोला येथील खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची प्रतिभावान खेळाडू देवयानी जितेंद्र भुयार हिने १४ वर्षांखालील रोप मल्लखांब प्रकारात उत्कृष्ट कामगिरी सादर केली. तिच्या प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

देवयानी ही मनीबाई गुजराती शाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी असून ती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात प्रा. विलास दलाल, प्रा. अनिल नागपुरे (खेलो इंडिया मल्लखांब प्रशिक्षक) आणि प्रा. मयूर दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ. माधुरी चेंडके, डॉ. श्रीकांत चेंडके, डॉ. संजय तिरथकर आणि प्रा. रवींद्र खांडेकर यांनी देवयानीचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

🏅 क्रीडा क्षेत्रातील या यशामुळे अमरावतीच्या मल्लखांब परंपरेला नवी झळाळी लाभली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!