Join WhatsApp group

Ads

युवकाचा खून खुनांचे सत्र थांबेना! अकोल्यात आठवड्यात दुसरी हत्या

By Sarkarmzanews

November 28, 2026 11:07 am

Ads

अकोला शहरात गुन्हेगारीचा आलेख नेमका कोणत्या दिशेने जात आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोरक्षण रोडवरील पॉवर हाऊससमोर मदर डेअरीजवळ शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) रात्री झालेल्या रक्तरंजित घटनेत आकाश सुनील गवई या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

विशेष म्हणजे, जवाहरनगर परिसरातील हत्येची घटना ताजी असतानाच आठवडाभरात शहरात दुसरा खून झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कृषीनगर येथील रहिवासी आकाश गवई हा शुक्रवारी रात्री मित्रांसोबत गोरक्षण रोडवरील मदर डेअरीजवळील अंड्याच्या गाडीवर गेला होता.

यावेळी काही कारणावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर आकाशवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!