Join WhatsApp group

Ads

अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई शहानुरमध्ये गांजाची १२ झाडे जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

November 17, 2026 11:04 am

Ads

ऑपरेशन प्रहार नार्को स्ट्राईक अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई; ३४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त, किंमत ६ लाख ८० हजार रुपये

अकोट : अमली पदार्थांविरोधात अकोला जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार नार्को स्ट्राईक’ अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. शहानुर येथे घराच्या आवारात तुरीच्या झाडांमध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी गांजाची एकूण १२ झाडे जप्त केली.

या कारवाईत ३४ किलो ६० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शहानुर येथील सचिन लक्ष्मण जांभळे याच्या घराच्या मागील बाजूस तुरीच्या झाडांमध्ये गांजाची लागवड करण्यात आली आहे.

त्यानुसार वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी अनिललाल लालजी धांडेकर (वय ३१, रा. सोमठाणा, ता. चिखलदरा, ह.मु. शहानुर) याच्याकडून पाने, फुले, बिया, कळ्या, खोड व मुळांसह गांजाची १२ झाडे जप्त करण्यात आली.या प्रकरणी सचिन लक्ष्मण जांभळे (वय ४०, रा. शहानुर) आणि अनिललाल लालजी धांडेकर या दोघांविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२२/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.अमली पदार्थांबाबत माहिती देण्याचे आवाहनजिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेत स्वतंत्र अमली पदार्थविरोधी कक्ष (Anti-Narcotic Cell) स्थापन करण्यात आला आहे.

नागरिकांना अशा अवैध प्रकारांची माहिती असल्यास सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख (मो. ८८८८०९६०४६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Related Article

समाजात काम करणारा नेता बनविण्यात पत्रकारांचे मौलिक योगदान! – शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक

पेट्रोल-डिझेलमधील कथित भेसळीविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस!बार्शीटाकळी व पातूरमधील अवैध विक्रीचे गंभीर आरोप; जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

अकोला बसस्थानकात ‘नो पार्किंग’चा फज्जा!पोलीस चौकी समोरच पोलिसांची वाहने?

नंबर एक, गाड्या दोन! मंगेशने नेमकी काय भानगड केली ?

हिरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ पोलिसांचा गांजा तस्करीवर प्रहार!ऑटोमधून दोन किलो गांजा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सरकार माझा न्यूजची विशेष नजर : फटाक्यांचा शिल्लक साठा कुठे? प्रशासनाचे लक्ष आहे का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!