Join WhatsApp group

Ads

अकोला बसस्थानकात ‘नो पार्किंग’चा फज्जा!पोलीस चौकी समोरच पोलिसांची वाहने?

By Sarkarmzanews

November 16, 2026 3:37 pm

Ads

बसस्थानक कर्मचाऱ्यांच्याही गाड्या नो पार्किंगमध्ये; शहर वाहतूक विभाग झोपेत?

अकोला : शहरातील वाहतूक शिस्तीचा दावा करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र अकोला बसस्थानक परिसरात पाहायला मिळत आहे. येथे नो पार्किंगच्या नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवली जात असून, बेशिस्त पार्किंग सुरू असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, या प्रकारात केवळ सामान्य वाहनधारकच नाहीत, तर बसस्थानकातील कर्मचाऱ्यांच्या वाहनांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. नो पार्किंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या गाड्या सर्रास उभ्या राहत असताना संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस चौकीवर नो पार्किंगचा सूचना फलक लावलेला असतानाही त्याच पोलीस चौकीसमोर पोलिसांची वाहने उभी असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या पोलिसांवर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच चौकीसमोर नियमांचे उल्लंघन होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमका कोणता आदर्श घ्यायचा?

बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोलीस चौकी अगदी जवळ असतानाही परिस्थितीत बदल होत नसेल, तर शहर वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.नो पार्किंगचा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का?

बसस्थानक कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर आणि पोलीस चौकीसमोर उभ्या असलेल्या वाहनांवरही नियमांनुसार कारवाई होणार का? की नियमभंग करणाऱ्यांना त्यांच्या पदानुसार वेगवेगळे निकष लावले जातात?आता शहर वाहतूक विभाग आणि बसस्थानक प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार की अकोला बसस्थानकातील नो पार्किंगचा फज्जा असाच सुरू राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकार माझा न्यूजचा थेट सवाल : पोलीस चौकीसमोरच वाहतूक नियमांना हरताळ फासला जात असेल, तर शहरातील वाहतूक शिस्तीची अपेक्षा तरी कोणाकडून करायची?

Related Article

समाजात काम करणारा नेता बनविण्यात पत्रकारांचे मौलिक योगदान! – शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक

पेट्रोल-डिझेलमधील कथित भेसळीविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस!बार्शीटाकळी व पातूरमधील अवैध विक्रीचे गंभीर आरोप; जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

अकोला बसस्थानकात ‘नो पार्किंग’चा फज्जा!पोलीस चौकी समोरच पोलिसांची वाहने?

नंबर एक, गाड्या दोन! मंगेशने नेमकी काय भानगड केली ?

हिरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ पोलिसांचा गांजा तस्करीवर प्रहार!ऑटोमधून दोन किलो गांजा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सरकार माझा न्यूजची विशेष नजर : फटाक्यांचा शिल्लक साठा कुठे? प्रशासनाचे लक्ष आहे का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!