Join WhatsApp group

Ads

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

By Sarkarmzanews

October 31, 2026 9:03 am

Ads

झालावाड : राजस्थानमध्ये पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच झालावाड जिल्ह्यातील सूमर ग्रामपंचायतीत एक अनोखा आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रकार समोर आला आहे. सरपंचपदाच्या उमेदवार मनभर बाई या निवडणूक प्रचारात आणि मतदारांच्या भेटीगाठींमध्ये एवढ्या व्यस्त झाल्या की, त्यांच्या उमेदवारीसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले कामच त्यांच्या हातून राहून गेले.

मनभर बाई यांनी गावातील मतदारांच्या भेटी घेत प्रचाराचा धडाका सुरू केला. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी जोरदार जनसंपर्क केला. मात्र, या प्रचाराच्या धावपळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतच निघून गेल्याचे समोर आले.निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी, मतदारांशी संपर्क आणि प्रचाराची रणनीती तयार असतानाही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या निवडणूक लढण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.

परिणामी, ज्या निवडणुकीसाठी त्या मतदारांच्या दारोदारी फिरत होत्या, त्या निवडणुकीच्या मैदानातच त्यांना उतरता आले नाही.या प्रकाराची चर्चा सध्या परिसरात रंगली असून, ‘प्रचार झाला, मतदार भेटले; पण उमेदवारी अर्जच राहिला!’ अशी मिश्कील प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.

निवडणुकीत प्रचारापेक्षा उमेदवारी अर्ज दाखल करणे हा पहिला आणि अत्यावश्यक टप्पा असतो. मात्र, प्रचाराच्या उत्साहात हा मूलभूत टप्पाच विसरला गेल्याने हा प्रकार निवडणूक व्यवस्थेतील एक वेगळाच किस्सा ठरला आहे.

NEWS PHOTO – AI GENRATED

Related Article

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

उपोषण सुरू होताच ‘विना आमंत्रित’ नेत्यांची एन्ट्री! आजकल चर्चेचा विषय

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

🚨 मोठी बातमी | सरकार माझा न्यूज वरप्रमाणपत्राचा ‘खेळ’ पडणार उघड?नोंदीत तफावत, रक्तनात्याचे पुरावे मागवले; चौकशीवर दबावाच्या चर्चेने खळबळ!

मटक्यावर कारवाई, बुकींचे काय?एकावर गुन्हा; शहरातील कथित मटका नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!