Join WhatsApp group

Ads

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांचा एल्गार!

By Sarkarmzanews

August 12, 2026 4:14 pm

Ads

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे; ई-केवायसी तातडीने सुरू करण्याची मागणी लाभ रोखल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

श्रीकांत पाचकवडे: अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करा, ई-केवायसीअभावी थांबलेला आर्थिक लाभ पूर्ववत करा आणि प्रलंबित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवारच्या वतीने बुधवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाचे लक्ष वेधले.‘ई-केवायसी बंद, मग लाभ कसा मिळणार?’

ई-केवायसी प्रक्रिया बंद असल्यामुळे पात्र असूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. योजनेचा आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा असताना तांत्रिक प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.

“ई-केवायसीच्या कारणामुळे एका पात्र महिलेचाही लाभ थांबता कामा नये. शासनाने तातडीने प्रक्रिया सुरू करून प्रलंबित रक्कम अदा करावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

फिरोज खान हसन खान यांच्या पुढाकाराने आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवारचे अकोला पश्चिम अध्यक्ष फिरोज खान हसन खान यांच्या पुढाकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले.

फिरोज खान हसन खान यांनी शासनाने महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.

ई-केवायसीसाठी पुरेसा कालावधी द्यावा, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि पात्र लाभार्थी महिलांचा थांबलेला लाभ तातडीने सुरू करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.मदत केंद्रांचीही मागणीई-केवायसी प्रक्रियेत अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने विशेष मदत केंद्रे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थींना पुरेसा वेळ देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिलांची मोठी उपस्थिती

आंदोलनाला प्रदेश उपाध्यक्ष श्याम अवस्थी, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी, कार्याध्यक्ष देवानंद ताले, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, महानगर युवा अध्यक्ष देवानंद राऊत, महानगर महासचिव शेख ऐनुलहक कुरेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सालार भाई, शैलेश बोधडे, ॲड. संदीप तायडे, बाबा घुमरे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सौ. सरला ताई वरघट, मनीषा महाले, कोकिळाताई वाहूर वाघ, संगीता बाळू, नाजीमा परवीन, सुलभा घाडगे, उषा मकासरे, रेखा वरघट, सरिता घाडगे, उषाताई वानखडे, सभी या बानू, शफिया बिन, कमरून निसा आणि परविन बानू यांची उपस्थिती होती.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनधरणे आंदोलनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून पात्र महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करून पात्र महिलांचा थांबलेला लाभ पूर्ववत केला नाही, तर यापेक्षा मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

“पात्र महिलांना त्यांचा हक्क मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.आंदोलनात मोहम्मद उमर फारूक, हुसैन खान सुलतान खान, सैयद मोहसिन, फिरोज भाई, सैयद रिजवान, याया पठाण, आकाश बुंदेले, शैलेश गजभिये, कार्तिक देशमुख, वेद ठाकरे, संकेत चोपडे, नितेश बोराखडे आणि प्रदीप मस्तूद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!