Join WhatsApp group

Ads

कायटे मॅडम, सिव्हिल लाईन हद्दीत नेमकं चाललंय तरी काय?

By Sarkar Maza

August 10, 2026 1:40 pm

Ads

जठारपेठ, जवाहरनगर ते उमरी नाका परिसरात वरली-मटक्याची चर्चा; कोणत्या नगरसेवक की माजी नगरसेवकाचा धाक?

अकोला : सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत जठारपेठ चौक, जवाहरनगर चौक तसेच उमरी नाका परिसरातील जगदंबा मंदिराजवळ कथित वरली-मटका व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. भरवस्तीत सुरू असल्याचे सांगितले जाणारे हे प्रकार पाहता पोलीस निरीक्षक कायटे मॅडम यांच्या हद्दीत पोलिसांचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

या कथित अवैध व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक चर्चा रंगली आहे—या भागात नेमका कोणत्या विद्यमान नगरसेवकाचा धाक आहे की कोणत्या माजी नगरसेवकाचा? कोणाच्या राजकीय प्रभावामुळे हे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे, याची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. संबंधित नगरसेवक किंवा माजी नगरसेवकाचा वरली-मटका व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असल्याचे मात्र अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही.

कायटे मॅडम, कारवाई कुठे?

जठारपेठ चौक, जवाहरनगर चौक आणि उमरी नाका परिसरातील नागरिकांकडून जर वारंवार कथित वरली-मटक्याबाबत तक्रारी होत असतील, तर त्यावर ठोस कारवाई का होत नाही? कारवाई झाली असेल तर हे प्रकार पुन्हा चर्चेत का येत आहेत?

नगरसेवक असो किंवा माजी नगरसेवक—कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे का? राजकीय प्रभावाचा वापर होत आहे का? आणि असेल तर त्याची चौकशी करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का?

नागरिकांचा सवाल एकच—कायटे मॅडम, सिव्हिल लाईन हद्दीत वरली-मटका थांबणार कधी?

Related Article

निंबी मालोकार येथे गोळीबार; ३९ वर्षीय अमोल मालोकार यांची हत्या सहा राऊंड फायरिंगने गावात खळबळ;

‘१ गोळी हवी तर एकच मिळणार!’ मेडिकल स्टोअर्सना तुकाराम मुंढेंचा दणका

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश? ‘त्या’ कोहिनूर हिऱ्याच्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने बदलणार शहराचे राजकीय समीकरण!

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!