Join WhatsApp group

Ads

-

अकोल्यात प्राथमिक आरोग्य सेवेला नवी ऊर्जा संयुक्त प्रशिक्षणातून आरोग्य पथक अधिक सक्षम

By Sarkarmzanews

August 12, 2026 11:29 am

Ads

अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष संयुक्त प्रशिक्षण मोहिमेला अकोला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढून गावपातळीवरील आरोग्य सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आशा, एएनएम, एमपीडब्ल्यू, सीएचओ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी अशा संपूर्ण आरोग्य पथकाला एकत्रित प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी विविध घटकांचे स्वतंत्र प्रशिक्षण घेतले जात होते. मात्र आता ७ ते १० सदस्यांचे संपूर्ण पथक एकाच वेळी प्रशिक्षण घेत असल्याने कामातील समन्वय, संवाद आणि जबाबदारीची जाणीव अधिक मजबूत होणार आहे.

आरोग्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भरप्रशिक्षणामध्ये माता व बालमृत्यू शून्यावर आणणे, क्षयरोगाचा एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये तसेच उपचार अर्धवट सोडू नयेत, यावर विशेष भर दिला जात आहे. त्याचबरोबर ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची रक्तदाब व मधुमेह तपासणी करणे आणि आगामी पाच वर्षांत कर्करोगाचे व्यापक स्क्रीनिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आशा, एएनएम आणि एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांनी केवळ अहवाल व कागदपत्रांच्या पूर्ततेपुरते मर्यादित न राहता गावातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर प्रशिक्षणात भर दिला जात आहे.प्रशिक्षणानंतरही ‘मेंटर’कडून मार्गदर्शनया उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही प्रशिक्षकांची भूमिका संपणार नाही.

प्रशिक्षक ‘मेंटर’ म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतील. कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याबरोबरच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचा नियमित आढावाही घेतला जाणार आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री बिपटे यांच्या नियोजनातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणाचे दस्तऐवजीकरण व मूल्यमापन केले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यानची छायाचित्रे, उपक्रमांची माहिती तसेच कर्मचाऱ्यांच्या यशोगाथा विविध माध्यमे आणि संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी दिली.

गावपातळीवरील आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटक एकत्रितपणे सक्षम झाल्यास अकोला जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेला निश्चितच नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त होत आहे.

Related Article

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांचा एल्गार!

मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा!तालुकास्तरीय चौकशी समिती रद्द करून पाच सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठित करण्याची माजी उपसरपंच अर्चना चोपडे यांची मागणी

हेल्मेटसक्ती अकोलेकरांसाठी ठरतेय डोकेदुखी, शहरात हेल्मेट सक्तीला स्थगिती द्या! युवक काँग्रेसची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

राजेंद्र पातोडेंच्या सत्कारातून पुरोगामी एकजुटीचा हुंकार!

घाम गाळा, आरोग्य कमवा! रेड रन मॅरेथॉनमधून युवकांना संदेश

रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!