Join WhatsApp group

Ads

दानापूर ग्रामपंचायतीच्या खर्चावर गंभीर सवाल; चौकशीचे आदेश!

By Sarkarmzanews

August 12, 2026 11:25 am

Ads

४४ ट्रिप घनकचरा, २२ तास जेसीबी अन् झुडपे तोडण्यावर हजारोंचा खर्च; ‘काम झाले तरी कुठे?’ ग्रामस्थांचा सवाल

अकोला : दानापूर ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीतून करण्यात आलेल्या काही खर्चांवरून आता प्रशासनासमोरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. घनकचरा वाहतुकीच्या ४४ ट्रिप, तब्बल २२ तास जेसीबीचा वापर आणि काटेरी झुडपे तोडण्याच्या कामावर हजारो रुपयांचा खर्च दाखविण्यात आल्याने या कामांची प्रत्यक्षता आणि खर्चाच्या नोंदी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीची दखल घेत पंचायत समिती तेल्हारा प्रशासनाने ११ ऑगस्ट रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत.दानापूर ग्रामपंचायतीच्या ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मासिक सभेत सामान्य निधीतील विविध खर्चाचे प्रस्ताव चर्चेला आले. त्यामध्ये घनकचरा उचलण्यासाठी ४४ ट्रिपवर १९ हजार ८०० रुपये, काटेरी झुडपे तोडण्यासाठी ६ हजार ८०० रुपये, तर घनकचरा ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी २२ तास जेसीबी वापरल्यापोटी २६ हजार ८०० रुपये खर्चाचा उल्लेख करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कागदावर काम, प्रत्यक्षात किती?

याच खर्चावर प्रशासक सदस्य गोपाल माधवराव विखे यांनी आक्षेप घेतला आहे.

स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर संबंधित कामे प्रत्यक्षात झाली आहेत का?

झाली असतील तर दाखविण्यात आलेल्या प्रमाणात झाली आहेत का?

४४ ट्रिप घनकचरा नेमका कुठून उचलला आणि कुठे टाकला?

२२ तास जेसीबी नेमका कुठे चालला? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

त्यामुळे केवळ कागदोपत्री खर्चाच्या नोंदी न पाहता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाचे मोजमाप, ट्रिपची नोंद, जेसीबी वापराचा तपशील आणि संबंधित देयके तपासावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासकीय काळात एवढा खर्च करण्याचा अधिकार होता का?या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय व्यवस्था असताना सामान्य निधीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार होते का?

खर्चाला मंजुरी देण्याची प्रक्रिया नियमांनुसार झाली का? संबंधित कामांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी उपलब्ध आहेत का?

याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.३ ऑगस्टच्या तक्रारीनंतर प्रशासनाची हालचालगोपाल माधवराव विखे यांनी ३ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तेल्हारा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर प्रशासनाने चौकशीसाठी अधिकृत पत्र काढले असून ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता चौकशी होणार आहे.“जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावाच लागेल”“ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीतील पैसा हा जनतेचा पैसा आहे.

त्यामुळे प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब मिळालाच पाहिजे. कामे प्रत्यक्षात झाली असतील तर त्याची कागदोपत्री आणि प्रत्यक्ष पुराव्यांसह खातरजमा व्हावी. चौकशी निष्पक्ष झाली तर वस्तुस्थिती निश्चितपणे समोर येईल. अहवाल येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार,” असा इशारा गोपाल माधवराव विखे यांनी दिला.

दरम्यान, या तक्रारीतील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून चौकशीअंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र, ४४ ट्रिप घनकचरा, २२ तास जेसीबी आणि हजारो रुपयांच्या खर्चाभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची प्रशासनाकडून आता कोणती उत्तरे मिळतात, याकडे दानापूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Article

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांचा एल्गार!

मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा!तालुकास्तरीय चौकशी समिती रद्द करून पाच सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठित करण्याची माजी उपसरपंच अर्चना चोपडे यांची मागणी

हेल्मेटसक्ती अकोलेकरांसाठी ठरतेय डोकेदुखी, शहरात हेल्मेट सक्तीला स्थगिती द्या! युवक काँग्रेसची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

राजेंद्र पातोडेंच्या सत्कारातून पुरोगामी एकजुटीचा हुंकार!

घाम गाळा, आरोग्य कमवा! रेड रन मॅरेथॉनमधून युवकांना संदेश

रोजगार हमीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!