Join WhatsApp group

Ads

एक पक्ष प्रवेश… आणि पलटू शकते संपूर्ण राजकीय समीकरण?

By Sarkar Maza

August 4, 2026 7:03 pm

Ads

मुर्तिजापूर शहरातील राजकारण सध्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. नगरपरिषदेमध्ये सुरू असलेल्या गटबाजीच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापले असताना, आता अविश्वास प्रस्ताव कोणत्या पण वेळी येऊ शकतो, अशा चर्चांनी आणखी रंग भरला आहे.

या घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाने शहरात पुन्हा पक्षप्रवेश अभियान सुरू केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राजकारणात कोणतीही हालचाल विनाकारण होत नसते. विशेषतः निवडणूकिचा वातावर नसताना मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू होणे, स्थानिक नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी, बंद दाराआड बैठका आणि कार्यकर्त्यांची वाढलेली लगबग यामुळे काहीतरी मोठी राजकीय रणनीती आखली जात असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

सध्या सर्वाधिक चर्चा एका प्रभावशाली, प्रतिष्ठित आणि वजनदार स्थानिक नेत्याभोवती रंगली आहे. हा नेता नेमका कोण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरू असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अंदाज व्यक्त करत आहे.

काही राजकीय जाणकारांचे मत आहे की, हा संभाव्य पक्षप्रवेश केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहणार नाही. त्या नेत्यासोबत नगरपरिषदेतील काही सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही मोठा गट नव्या राजकीय वाटेवर जाऊ शकतो. तसे झाले तर नगरपरिषदेतील विद्यमान राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

नगरपरिषदेमधील गटबाजी आणि अविश्वास प्रस्तावाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य पक्षप्रवेश अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. जर या घडामोडींना प्रत्यक्ष स्वरूप आले, तर शहरातील सत्तेची गणिते बदलू शकतात आणि अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेली राजकीय मांडणी नव्याने लिहिली जाऊ शकते.

सध्या शहरातील चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय कार्यालयांपर्यंत एकच प्रश्न ऐकायला मिळत आहे—“तो नेता कोण?” प्रत्येक राजकीय पक्ष या चर्चांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे चित्र आहे. काहीजण हे केवळ राजकीय अफवा असल्याचे सांगत आहेत, तर काहींच्या मते योग्य वेळ येताच मोठी घोषणा होऊ शकते.

दरम्यान, या सर्व चर्चांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या घडामोडींकडे संभाव्य राजकीय चर्चांच्या स्वरूपातच पाहणे आवश्यक आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

एक मात्र निश्चित आहे—मुर्तिजापूरच्या राजकारणात सध्या शांतता दिसत असली, तरी पडद्यामागे राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत कोणता निर्णय समोर येतो आणि कोणता नेता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतो, यावर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. कारण एका मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुर्तिजापूरच्या राजकारणाचा पट नव्याने मांडला जाऊ शकतो.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!