Join WhatsApp group

Ads

----

मोरगाव भाकरे येथील RO प्लांटचे कुलूप तोडल्याचा आरोप; दलित ठेकेदाराने न्यायाची मागणी

By Sarkar Maza

July 4, 2026 5:38 pm

Ads


करार न करता प्लांट बंद केल्याचा आरोप; 28 हजारांची रोख रक्कम व कॉइन बॉक्समधील पैसे गायब झाल्याची तक्रार


अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीच्या RO प्लांट प्रकरणाने नवीन वळण घेतले असून, प्लांट हराशीमध्ये घेतलेल्या गजानन महादेव चोपडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.


तक्रारीनुसार, गजानन महादेव चोपडे यांनी 15 मे 2025 रोजी ग्रामसभेत झालेल्या हराशीत 65 हजार रुपयांची बोली लावून एक वर्षासाठी RO प्लांट चालविण्याचा हक्क मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नियमानुसार ठरलेली रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा करून प्लांटचा ताबा घेतला आणि तो नियमितपणे चालवत होते.


मात्र, 2 जुलै 2026 रोजी कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता ग्रामपंचायत प्रशासक, सचिव व इतर कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून RO प्लांटचे कुलूप तोडून नवीन कुलूप लावल्याचा आरोप चोपडे यांनी केला आहे. त्यावेळी प्लांटमध्ये सुमारे 28 हजार रुपये रोख रक्कम तसेच कॉइन बॉक्समध्ये अंदाजे 2 ते 2.2 हजार रुपयांची चिल्लर असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही तत्काळ चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा आरोपही चोपडे यांनी केला आहे.

संबंधितांवर गुन्हा दाखल करून आपली रक्कम परत मिळावी तसेच उर्वरित कराराचा कालावधी पूर्ण करण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गजानन महादेव चोपडे हे अनुसूचित जाती (दलित) समाजातील असून, प्रशासनाकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


दरम्यान, या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचा खुलासा आणि पोलिसांच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!