Join WhatsApp group

Ads

यादव ढाब्यावर इंधनाचे अवैध खेळ; प्रशासनाची धडक कारवाई कधी?

By Sarkar Maza

June 6, 2026 6:42 pm

Ads

मुर्तिजापूर: नागोली-नागठाणा येथील यादव ढाब्यावर पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली असून नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकीकडे देशाचे पंतप्रधान इंधन बचतीचे आवाहन करत असताना, सामान्य नागरिकांना पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत यादव ढाब्यावर कमी दरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध कसे होते, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी विक्री होणाऱ्या इंधनाच्या गुणवत्तेबाबतही शंका व्यक्त केली जात असून, “कमी दरातील इंधनामध्ये भेसळ तर नाही ना?” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

तसेच मोठ्या प्रमाणात इंधनाची साठवणूक होत असल्यास ते सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की या कथित व्यवहारामागे पातूरचे दोन मित्र सक्रीय आहे. स्थानिक नागरिकांकडून असा दावा केला जात आहे.

पप्पू आणि फरहान व्यक्तींचा यापूर्वी पातूर परिसरातील कथित अवैध पेट्रोल-डिझेल व्यवहारांशी संबंध असल्याची चर्चा होती.

तसेच त्यांचा क्रिकेट बेटिंग (बुकिंग) क्षेत्राशी संबंध असल्याचेही काही जणांकडून बोलले जात आहे. मात्र या सर्व दाव्यांची आणि आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही, तसेच संबंधित व्यक्तींची बाजू समोर आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर पुरवठा विभाग, महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित तेल कंपन्यांनी संयुक्त तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

जर सर्व व्यवहार कायदेशीर असतील तर ते स्पष्ट व्हावे आणि जर काही अनियमितता आढळून आली तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे.

NEWS PHOTO-AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!