Join WhatsApp group

Ads

-

“RS च्या रिकाम्या बाटलीला ₹8 भाव; पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?”

By Sarkar Maza

June 5, 2026 10:23 am

Ads

मूर्तिजापूर : शहरात सध्या RS ब्रँडच्या रिकाम्या दारूच्या बाटल्यांची ₹8 प्रति बाटली दराने खरेदी होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे इतर अनेक प्रकारच्या रिकाम्या काचेच्या वस्तूंना भंगारात वजनानुसार दर मिळत असताना, केवळ RS बाटलीला स्वतंत्रपणे प्रति नग दर दिला जात असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

या बाटल्यांचा नेमका उपयोग कशासाठी केला जातो? त्या अधिकृत पुनर्वापरासाठी वापरल्या जातात की अन्य कोणत्या कारणासाठी, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि शंका निर्माण झाली आहे.

काही नागरिकांनी अशी मागणी केली आहे की संबंधित यंत्रणांनी या व्यवहाराची माहिती घेऊन या बाटल्यांचा अंतिम वापर कुठे आणि कशासाठी होतो याची पडताळणी करावी.

मात्र, डुप्लिकेट दारू निर्मिती किंवा अन्य बेकायदेशीर वापराबाबत सध्या कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

तरीही, RS बाटल्यांना मिळणारा विशेष दर आणि त्यामागील कारण याबाबत प्रशासनाने स्पष्टता आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!