Join WhatsApp group

Ads

मानसून पूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण महान धरणावर संपन्न विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड यांनी घेतले प्रशिक्षणाचे धडे

By Sarkar Maza

June 6, 2026 10:38 am

Ads

पूर परिस्थिती अपघातग्रस्तांना मदतीसाठी सज्ज

अकोला – मानसून पूर्व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून मानसून पूर्व आपदा प्रशिक्षण बार्शीटाकली ता. महान धरणावर आज सकाळी संपन्न झाले या प्रशिक्षणाला विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक मंडळ अधिकारी आपदा मित्र उपस्थित होते यावेळी एस डी आर एफ तर्फे प्रशिक्षण देण्यात आले

अकोला जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी निर्माण होनार्या पूर परिस्थितीत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो या गावातील नागरिकांचे प्राण वाचावे जीवित हानी काढावी यासाठी जिल्ह्याची सक्रिय असलेल्या आपत्कालीन शोध बचाव पथक आपदा मित्र ,मंडळ अधिकारी पोलीस कर्मचारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत ४ जून रोजी महान धरणावर प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कार्या सक्रिय असलेल्या विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव यांचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमाला बार्शी टाकली तहसीलदार रवींद्र कापसिकर,राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक डी.जे दाते, सहायक पोलीस निरीक्षक पी एस कोडाप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साबळे,

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित गाडगे महाराज आपत्कालीन बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे, मा. मंडळ अधिकारी सुनील कल्ले, प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख योगेश विजयकर, विजय माल्टे, दिनेश श्रीनाथ, अक्षय मोरे, शुभम दामोदर, वसीम खतीब, राजिक अली, उपस्थित होते यावेळी आपत्ती प्रतिसाद दल नागपूर तर्फे मॉक डिल, सी पी आर, प्रशिक्षण संपन्न झाली

यावेळी गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथक, विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक, माॅ चंडिका आपत्काली पथक, वंदे मातरम् पथक, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी आपदा मित्र उपस्थित होते

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!