Join WhatsApp group

जंगली श्वापद आडवे आल्याने दुर्दैवी अपघात — खेर्डा येथील तरुणाचा मृत्यू

Photo of author

By Sarkarmzanews

Share


मुर्तीजापूर : प्रतिनिधी : ०२ नोव्हे. २५ : मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 44/25 कलम 194 BNSS 2023 प्रमाणे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी प्रणव बबनराव रननवरे (वय 31, व्यवसाय शेती, रा. खेर्डा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अभय लक्ष्मण चोपडे (वय 23, रा. खेर्डा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) हा आपल्या मित्रासह काही कामानिमित्त मुर्तीजापूर येथे आला होता.

दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 11.30 वाजता मुर्तीजापूर ते कारंजा जाणाऱ्या रस्त्यावर अशोक पेट्रोल पंपासमोर दुर्दैवी घटना घडली. यावेळी मृतक आपल्या मित्राच्या मालकीची मोटारसायकल (क्र. MH-29 AP-8052) चालवत असताना अचानक जंगली श्वापद मोटारसायकलसमोर आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल घसरून तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सदर मर्ग प्रकरण पोलीस हवालदार दिलीप आठवले (ब. क्र. 1824) यांनी नोंदवले असून तपास हवालदार रवि जाधव (ब. क्र. 116, पो. स्टे. मुर्तीजापूर ग्रामीण) करीत आहेत.

या अपघातामुळे खेर्डा गावात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!