Join WhatsApp group

Ads

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

By Sarkarmzanews

September 30, 2026 6:28 pm

Ads

मूर्तिजापूर : सोलर ग्राहकांच्या कामासंदर्भात चर्चा करताना MSEDCLच्या अधिकाऱ्याने अपमानास्पद व अशोभनीय भाषेचा वापर केल्याचा आरोप करीत चांडक सोलरचे मालक सचिन रामेश्वर चांडक यांनी MSEDCLच्या मूर्तिजापूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तक्रारीनुसार, दि. २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान काही सोलर ग्राहकांच्या कामासंदर्भात MSEDCLचे JE (Urban-1) अतुल टेकाडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी Solar Vendor व ग्राहकांसमोर उद्धट व अपमानास्पद स्वरूपाची वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामध्ये “तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”, “तुम्ही पहिले वायरिंग शिकून घ्या, नंतर काम करा” तसेच “तुम्हाला काम करायची पद्धत माहिती नाही”, अशा वक्तव्यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा वक्तव्यांमुळे व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा चांडक यांनी केला आहे.

सोलर कामात काही तांत्रिक त्रुटी किंवा नियमांचे उल्लंघन असल्यास MSEDCLकडून नियमानुसार लेखी सूचना व तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्याऐवजी अपमानास्पद भाषा वापरणे योग्य कार्यालयीन पद्धत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी स्पष्टीकरण घ्यावे, घटनेच्या वेळी उपस्थित व्यक्तींची माहिती नोंदवावी आणि आरोप तथ्यात्मक आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित सोलर कामामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यास त्या लेखी स्वरूपात कळवाव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे.तक्रारीची प्रत MSEDCLचे अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच मूर्तिजापूरचे आमदार यांना माहितीसाठी देण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांबाबत MSEDCLचे संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

Related Article

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

२८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने या लक्षवेधी कायद्याविषयी थोडक्यात माहिती…

शिवण खुर्दमध्ये शहीद भगतसिंग जयंती उत्साहातशहीद भगतसिंग क्रीडांगणाचे उद्घाटन; तरुणाईला मिळाले हक्काचे क्रीडा व्यासपीठ

🌡️ सुपर एल निनोचा इशारा! जगभरात 4.51 लाख अतिरिक्त मृत्यूंची शक्यता; भारतालाही मोठा धोका

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळातर्फे स्तंभपूजन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थानचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १.११ कोटींचा सहयोग

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!