Join WhatsApp group

Ads

वाडेगावात महिलांचा संताप उसळला; पाणीटंचाईसह नागरी समस्यांवर ग्रामपंचायतीला धारेवर

By Sarkar Maza

March 19, 2026 10:50 am

Ads

वाडेगाव (ता. बाळापूर) | प्रतिनिधी

वाडेगाव येथील इंदिरा नगर परिसरात वाढत्या नागरी समस्यांमुळे महिलांचा संताप उफाळून आला असून दिनांक १८ मार्च रोजी मोठ्या संख्येने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत आपला रोष व्यक्त केला.

परिसरात अपूर्ण पाणीपुरवठा, नाल्यांच्या बांधकामाचा अभाव आणि त्यामुळे सांडपाण्याची होत असलेली गैरसोय, तसेच रस्त्यांची दुरवस्था अशा विविध मूलभूत समस्यांचा पाढा महिलांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला. या समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे बाळापूर तालुका अध्यक्ष अभिषेक डोंगरे यांनी संबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले.दरम्यान, ग्रामपंचायत सचिव कापकर व सरपंच यांनी महिलांना आश्वासन देत १० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले.

मात्र, दिलेल्या मुदतीत समस्या न सुटल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित महिलांनी दिला आहे.

नागरी सुविधांच्या अभावामुळे महिलांना रस्त्यावर उतरावे लागणे, हे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!