Join WhatsApp group

Ads

“११ एप्रिलला सत्य बाहेर येणार की ‘डील’चा पर्दाफाश?” राजकारण, पत्रकारिता आणि पैशांचा संगम?

By Sarkar Maza

April 3, 2026 12:40 pm

Ads

मुर्तीजापुर प्रतिनिधी :मुर्तीजापुर नगरपरिषदेमधील एका नगरसेवकाच्या जात पडताळणी प्रकरणाने आता केवळ कायदेशीर नव्हे तर राजकीय आणि आर्थिक वर्तुळातही संशयाची ठिणगी पेटवली आहे.

११ एप्रिल रोजी धुळे येथे होणाऱ्या सुनावणीपूर्वीच या प्रकरणामागे “काहीतरी मोठं गणित” असल्याची चर्चा रंगू लागली आहे.ही याचिका स्थानिक एका तथाकथित पांढरपेशा पत्रकार तथा राजकीय पुढाऱ्याने दाखल केल्यामुळे प्रकरणाला वेगळाच रंग चढला आहे.

शहरात मात्र वेगळीच कुजबुज—“हे फक्त सत्यासाठीचं आंदोलन आहे, की यामागे आर्थिक देवाणघेवाणीचा अंडरकरंट आहे?”काही सूत्रांच्या दाव्यानुसार, संबंधित नगरसेवकाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ही चाल आखली गेली असावी.

तर दुसरीकडे, “सेटिंग” आणि “समजुती”च्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू असल्याचं बोललं जात आहे.ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली, त्याची पत्रकार आणि राजकीय पुढारी अशी दुहेरी ओळख असल्याने संशय अधिकच गडद होत आहे.

“जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न की स्वतःचा राजकीय अजेंडा साधण्याची खेळी?” हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

नगरपरिषदेमध्येही या प्रकरणावरून वातावरण तापलं असून, काही जण याला सरळ “राजकीय सूड” म्हणत आहेत. तर काही जण “वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल” असा सूचक इशारा देत आहेत.

आता सर्वांची नजर ११ एप्रिलच्या सुनावणीकडे लागली आहे.या सुनावणीतून खरोखर सत्य बाहेर येणार, की ‘राजकीय ट्विस्ट’सोबत एखादं आर्थिक रहस्यही उघड होणार?—

पुढील भागात: या प्रकरणामागील कथित ‘डील’ आणि स्थानिक राजकारणातील अदृश्य धागे उलगडणार!

Related Article

सोनम वांगचुकांच्या आंदोलनावर अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गप्प का?

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!