दिनांक ११ : चंद्रपूर,जिवती : जिवती तालुक्यात येत असलेले भारी पोलीस स्टेशन या स्टेशन पासून १० किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्याची सीमा लागलेली आहे. या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोमाने सुरू असून अवैध धंदेवाले जोमात ठाकरे ठाणेदाराचे दोन शिलेदार वसुली घेऊन मजेत असल्याची चर्चा जोमात सुरू असून या परिसरातून रात्री अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून व तसेच अवैध दारू विक्री, अवैध गांजा विक्री, मौल्यवान सागवानाची तस्करी भारी शेडवाई बाबापुर या मार्गाने तेलंगणा राज्यात केली जात असल्याची चर्चा सुरू असून ठाणेदाराचे विश्वासू दोन शिलेदार या सर्व अवैध धंद्यावाल्याकडून अवैधरित्या हप्ता घेत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.
परिसरातील नागरिकांना वाटलं होतं की नवागडी आलं आता नवा डाव टाकणार आणि परिसरात चालणारे अवैध धंदे बंद होणार परंतु तसे न होता अवैध धंदे अधिक गतीने जोमात सुरू असून. या अवैध धंद्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष? देतील का व अवैध धंदे बंद करण्यात येतील का? त्या दोन शिलेदाराची चौकशी होईल का अशी चर्चा सामान्य जनतेमध्ये सुरू आहे.
