Join WhatsApp group

अकोल्यातील उड्डाणपूल आणि अंडरपास समस्यांवर विजय अग्रवाल यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी पावसाळ्यात अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे मृत्यू; अकोल्यातील नागरी समस्या निकाली काढण्याची गरज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला :सिंधी कॅम्प चौक ते क्रिकेट क्लब आणि टॉवर चौक ते बस स्टँड या मार्गावरील उड्डाणपूल आणि अंडरपाससंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर भाजप नेते विजय अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडे लक्ष वेधले आहे. पथदिव्यांची कमतरता, रस्त्यावरील अडथळे आणि विशेषतः पावसाळ्यात अंडरपासमध्ये साचणारे पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व नॅशनल हायवेचे अधिकारी सोळंके यांच्याशी थेट संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

विजय अग्रवाल यांनी सांगितले की, अंडरपासमधील पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अंडरपासच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या विभागाने वारंवार तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद दिला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

“वृत्तपत्रांतून, वाहिन्यांतून वारंवार समस्या दाखवूनही अधिकारी वर्ग झोपेचे सोंग घेत आहे,” असे सांगत विजय अग्रवाल यांनी संबंधित ठेकेदाराकडून कायमस्वरूपी उपाययोजना करून घ्यावी, अशी मागणी केली.

या समस्येवर “सतत तक्रारी करूनही दुर्लक्ष होणे म्हणजे पक्षाची व सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्नच नव्हे का?” असा संशयही अग्रवाल यांनी व्यक्त केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात लक्ष देऊन योग्य न्याय दिला जाईल, अशी आश्वासक भूमिका घेतल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

नॅशनल हायवेचे अधिकारी सोळंके यांनी देखील फोनवर यासंदर्भात त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

नेत्यांचा संताप :

खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांनीही यापूर्वी या समस्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप ठोस उपाय न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!