मूर्तिजापूर,ता.१९ : तालुक्यातील शेलु वेताळ च्या वेताळबाबा मंदिर परीसरात आयोजित महिला शक्ति फाऊंडेशनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात गावांगावांतील महिलांनी महिला शक्ती वृद्धींगत करण्याचा वज्र निर्धार व्यक्त केला व आयोजकांनी कुठल्याही आडचणीत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याची ग्वाही दिली.
वेताळबाबा संस्थानचे अध्यक्ष राजु पाटील सरदार यांच्या अध्यक्षतेखालील या मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, जेष्ठ पत्रकार दिपक जोशी यांनी केले. महिला शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदेश रजाने, संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे,सहसचिव चंदा इंगळे,मंगला दिंडोकार, तुळशीराम गुंजकर, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव प्रभे,हमीदा बी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महीला शक्ती फाउंडेशनच्या केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे,केंद्रीय सहसचिव चंदाताई इंगळे, सदस्या मंगला दिंडोकार,अनुरुती गुहे,हमीदा बी,पुष्पा तिहीले,देवकाबाई सोलकर यांच्यासह आदी पदाधिकारी महिलांचा जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, प्रा.दिपक जोशी, सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव प्रभे,विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे, संगीताताई प्रभे यांनी या मेळाव्यात सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे,पत्रकार आनिल अग्रवाल, दीपक अग्रवाल, श्याम वाडसकर, सुमित सोनोने यांनी मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विश्वासराव पाचपाटील व आभारप्रदर्शन केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखडे यांनी केले. महिला शक्ती फाउंडेशनचे केंद्रीय सचिव गणेश वाकोडे,केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखडे,विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे, केंद्रीय सदस्य सुरेंद्र मोरे यांनी आयोजनात पुढाकार घेतला