Join WhatsApp group

Ads

हरीश आलिमचंदानींच्या ‘घरवापसी’चा मौखिक आदेश; महायुतीमुळे अकोल्यातील समीकरणे बदलणार

By Sarkarmzanews

December 27, 2025 11:12 am

Ads

अकोला : दिनांक २७: ✒️ नरेंद्र शर्मा :

आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकारणाला अचानक उधाण आले आहे. अकोला महानगरपालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार हालचाली सुरू केल्या असून, २५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या भाजपच्या अत्यंत महत्त्वाच्या बंदद्वार बैठकीत अकोल्यासंदर्भात दोन मोठे ‘मास्टर स्ट्रोक’ आखण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

महायुतीचा फॉर्म्युला: मतांचे विभाजन थांबवण्याचा डाव

या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की अकोला महानगरपालिका निवडणूक भाजप एकटी न लढता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत ‘महायुती’च्या बॅनरखाली लढणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास मतांचे विभाजन रोखता येईल आणि त्याचा थेट फायदा निवडणूक निकालात दिसून येईल, असा हिशोब भाजप हायकमांडचा आहे.

हरीश आलिमचंदानींची घरवापसी :

जुन्या दिग्गजांवर पुन्हा विश्वासया बैठकीतील सर्वात चर्चेचा आणि धक्कादायक निर्णय म्हणजे माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांच्या भाजपमधील पुनरागमनाबाबतचा. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप हायकमांडने स्थानिक नेतृत्वाला स्पष्ट मौखिक आदेश देत आलिमचंदानी यांना तात्काळ पक्षात परत घेऊन त्यांना सन्मानजनक भूमिका देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना प्रभाग क्रमांक १५ मधून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा असून, त्यामुळे या प्रभागातून इच्छुक असलेल्या इतर दावेदारांची धाकधूक वाढली आहे.

‘तिसरी आघाडी’ अडचणीत? पवित्रकार आणि गोखले परतणार का?

या घडामोडींमुळे शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आलिमचंदानींसोबतच ‘तिसरी आघाडी’ उभारण्याच्या तयारीत असलेले आशीष पवित्रकार आणि गिरीश गोखले हे नेतेही भाजपमध्ये परतणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे दोन्ही नेते भाजपमध्ये परतल्यास निवडणुकीपूर्वीच ‘तिसरी आघाडी’ नामशेष होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे निवडणूक लढत अधिक सरळ आणि रंगतदार ठरणार आहे.

एकूणच, नागपूरच्या बैठकीनंतर अकोल्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, आगामी महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!