Join WhatsApp group

Ads

-

प्रभाग ४ मध्ये वंचितची घोडदौड, नगराध्यक्ष पदासाठी मोठी आघाडी; दोन्ही नगरसेवक विजयी

By Sarkarmzanews

December 21, 2025 1:01 pm

Ads

मुर्तिजापूर |

प्रभाग क्रमांक ४ मधील मतपेट्या उघडताच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे.

आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या एकूण मतांमध्ये

भाजप – १,५२९ मते

वंचित बहुजन आघाडी – ३,५६२ मते

मशाल – २,५३५ मते अशी स्थिती आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ४ मधून नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

कुरेशी शमीम बानी अब्दुल रफिक यांना ६८३ मते

अब्दुल बाकी अब्दुल अजीज यांना ६४२ मते मिळाली असून, वंचित बहुजन आघाडीने या प्रभागात आपले वर्चस्व कायम राखले आहे.

पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम निकालाची उत्सुकता शहरात वाढली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!