Join WhatsApp group

वंचित बहुजन आघाडीचा इच्छुक उमेदवार सुमित नवलकार ओबीसीचा कुरणखेड सर्कलचा प्रबळ दावेदार,धनगर समाजाचा पाठिंबा, वाड्या वस्तीत बैठका, युवा समाजसेवक सुमित नवलकार यांची सर्कलमध्ये चर्चा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : दिनांक २ नोव्हेंबर २५ : नुकताच काही दिवसा अगोदर जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले यामध्ये प्रतिष्ठेचा मतदार संघ असलेला कुरणखेड जिल्हा परिषद मतदार संघ हा ओबीसी राखीव निघाला आहे यामध्ये हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचा गेल्या कित्येक वर्षांपासून गड मानला जातो या वंचित बहुजन आघाडीच्या गडाचा दावेदार ओबीसींचा चेहरा धनगर समाजाचे युवा नेतृत्व म्हणून सुमित नवलकर यांचे नाव पुढे येत आहे,

गेल्या अनेक वर्षांपासून युवा तरुण चेहरा म्हणून ओबीसी बांधवांसाठी लढणारे युवा नेतृत्व म्हणून सुमित नवलकर यांची वाड्या वस्ती मध्ये चर्चा आहे त्यांनी धनगर समाजाचं नेतृत्व केलं आहे धनगर समाजाला एकत्र करण्याचे काम केलं आहे अशा सुमित नवलकर यांची कुरणखेड जिल्हा परिषद सर्कल साठी चर्चा होत आहे त्याचबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने हे सुद्धा इच्छुक आहेत आहे.

सुमित नवलकर यांचा कुरणखेड सर्कल मधील धनगर समाज बांधवांसोबत चांगला जनसंपर्क असून या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक बैठका अनेक कार्यक्रम या सर्कलमध्ये राबवले आहे जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होतात सुमित नवलकर हे कुरणखेड, खडका, पळसो बढे, या ठिकाणी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आहे अशा ठिकाणी ते वाड्या वस्तीवर जाऊन बैठका घेत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रबळ दावेदार सध्या कुरणखेड जिल्हा परिषद मतदार संघात सुमित नवलकर यांच्या नावाची चर्चा आहे.

नुकताच त्यानी ता.2 रोजी कुरणखेड या गावात ओबीसी बांधवांची बैठक झाली त्या ओबीसी बांधवांच्या बैठकीला ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुरणखेड सर्कल मध्ये धनगर समाजा मधुन उमेदवार म्हणून सुमित नवलकर, ज्ञानेश्वर सुलताने, मोहन नागे, की माळी समाजा मधुन वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान असलेले दिनेश बोळे, विशाल उमाळे यापैकी कोणाला वंचित बहुजन आघाडीची तिकीट मिळते याकडे आता संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हे निवडणूक तिरंगी होनार असल्याची चर्चा आहे.

बातमी – योगेश विजयकर, कुरणखेड


Share

Leave a Comment

error: Content is protected !!