Join WhatsApp group

Ads

अज्ञात वाहनाची धडक – अनोळखी इसम ठार; माना पोलिसांचे नागरिकांना आवाहन

By Sarkar Maza

April 22, 2026 5:20 am

Ads

माना : मलकापूर फाटा (ता. मुर्तिजापूर) येथे काल पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दि. 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे अंदाजे 03:00 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत संबंधित इसमास जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्या इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर येत असून, अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर माना पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरू केली.या प्रकरणी माना पोलीस स्टेशन येथे अप क्र. 169/2026 नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 (निष्काळजी वाहन चालविणे) व 106(1) (मृत्यूस कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून,अंगावर असलेले कपडे व इतर तपशीलांच्या आधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास किंवा त्याची ओळख पटत असल्यास तात्काळ माना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!