Join WhatsApp group

Ads

-

उनखेड ते बॉस्टन… संतोष तायडे यांची प्रेरणादायी धाव: जिद्द, सराव आणि यश; संतोष तायडे बॉस्टन मॅराथॉनमध्ये

By Sarkar Maza

February 25, 2026 8:29 am

Ads

मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड येथील बीएसएफ जवान संतोष तायडे (वय ४८) यांनी ४२ किमी मॅराथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या Boston Marathon स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सध्या संतोष तायडे हे Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (मेस्को, पुणे) अंतर्गत Nagpur Municipal Corporation येथे सुरक्षा सेवेत कार्यरत आहेत. कर्तव्याची जबाबदारी सांभाळत त्यांनी कठोर सरावाच्या बळावर हे यश संपादन केले.

दिल्ली येथे पार पडलेल्या NDM Marathon स्पर्धेत त्यांनी बिब क्रमांक ४६७३४ सह सहभाग नोंदवत ४२ किमी अंतर ०३:०६:५२ या उत्कृष्ट वेळेत पूर्ण केले. या दमदार वेळेमुळे त्यांना बॉस्टन मॅराथॉनसाठी पात्रता प्राप्त झाली.

त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, सहकारी तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष तायडे यांची ही कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून आगामी बॉस्टन मॅराथॉनमध्ये ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Related Article

सोनम वांगचुकांच्या आंदोलनावर अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गप्प का?

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!