Join WhatsApp group

Ads

19 वर्षा आतील मुला मुलींचा (कबड्डी) महाराष्ट्र राज्याचा संघ अकोला येथून भिवानी (हरियाणा)येथे रवाना.

By Sarkarmzanews

December 5, 2024 5:53 pm

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला दिनांक ५ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दि. 02 ते 04 डिसेंबर 2024 दरम्यान करण्यात आले होते. सदर 19 वर्षातील मुले – मुलींचा राष्ट्रीय कबड्डी संघ हरियाणा येथील भिवानी या शहरात दि. 7 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सदर राष्ट्रीय कबड्डी मुलांच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंचे नावे पुढील प्रमाणे आहेत – 1) गजानन कुऱ्हे, (वाशीम ),2) शुभम बिटके, (बीड ), 3) सागर जगदाळे ( (बीड ), 4) शिवदास भेंडेकर, (वाशीम ), 5) राज राठोड ( बीड ), 6) अर्जुन दडस, ( वर्धा ), 7) रणवीर पाटील (सांगली ), 8) अर्शद बशीर पन्हाळकर (कोल्हापूर ), 9) पृथ्वीराज पाटील ( अहमदनगर ), 10) शेख रियाझ सुलतान ( अहमदनगर ), 11) आदित्य डुकणे ( सांगली ), 12) माऊली शितोळे ( वर्धा )
निवड झालेला मुलींचा संघ पुढील प्रमाणे – 1) कु. श्रावणी भोसले ( इस्लामपूर ), 2) कु. प्रांजली थेटे, (पुणे ), 3) कु. अनुष्का सावंत ( वाशीम ), 4) कु.आर्या पाटील ( नाशिक ), 5) कु. अनुजा माळी ( वाशीम ),6) कु. कार्तिकी फडतरे ( छत्रपती संभाजी नगर ), 7) कु.श्रावणी सावंत ( छत्रपती संभाजी नगर ), 8) नम्रता सावंत ( नाशिक ), 9) कु. साक्षी शिंदे ( सांगली ), 10) कु. किरण चव्हाण ( यवतमाळ ), 11) कु.चिन्मयी ढगले ( रत्नागिरी ), 12) कु. कु. स्नेहल बोळने ( भंडारा )
मुलांचा संघाचा प्रशिक्षक म्हणून केतन गायकवाड हे आहेत तर मुलींच्या संघांचे महिला प्रशिक्षक म्हणून श्रीमती गीता साखरे राहणार आहेत. निवड झालेल्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंना मा. जिल्हाधिकारी श्री.अजित कुंभार सर यांनी शुभेच्छा देऊन विजयी होऊन महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून आणण्याचा आशीर्वाद दिला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीश्चंद्र भट्ट यांनी सुद्धा सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!