Join WhatsApp group

Ads

-

नियंत्रण सुटले अन् ट्रक दरीत; लोखंडी पाइप केबिनमध्ये घुसून दुर्दैवी अंत

By Sarkarmzanews

February 7, 2026 3:24 pm

Ads

माना : दिनांक ०७ : नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ शनिवारी (दि. ०७ फेब्रुवारी २०२६) रात्री भीषण अपघात घडला. आयशर ट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात चालक व क्लीनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२९-बीएफ-६०७४ क्रमांकाचा आयशर ट्रक नागपूर येथून संभाजीनगरकडे लोखंडी पाइप घेऊन जात होता. दरम्यान, ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने जाऊन पुलाजवळील खोल दरीत कोसळला.

अपघाताचा जोर इतका भीषण होता की ट्रकमधील लोखंडी पाइप केबिनमध्ये घुसले आणि चालक अनिसउद्दीन रफिकउद्दीन काझी व क्लीनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजिम (दोघे रा. जोहर नगर, बुलढाणा) यांच्या अंगावर कोसळले.

या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार दीपक सोळंके करीत आहेत.अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!