Join WhatsApp group

वनदेवी साधिका आश्रम तिनखेडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

नरखेड (ता. १ जुलै) — नरखेड तालुक्यातील तिनखेडा येथे असलेल्या प्रसिद्ध वनदेवी साधिका आश्रमात नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते वृक्षमित्र महादेवराव अरखेल यांनी आश्रमासाठी दिलेली ५० जातीवंत कडुलिंबाची रोपे.

कार्यक्रमाला आश्रमाच्या संचालिका परमपूज्य साध्वी दीदी माँ अर्पिता मानस भारती, नरखेड येथील माजी प्राध्यापक मेघळ सर, जन सेवा संस्था प्रमुख सुरेशजी शेंदरे, पतंजली योगपीठाचे आजीवन सदस्य पुरुषोत्तम थोटे, सामाजिक कार्यकर्ते विनोदराव क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

परमपूज्य दीदी माँ अर्पिता मानस भारती यांच्या हस्ते आश्रमाच्या परिसरात विविध ठिकाणी कडुलिंबाची रोपे लावण्यात आली. यावेळी महादेवराव अरखेल यांनी त्यांच्या स्वतःच्या रोपवाटिकेतून तयार केलेल्या ५० विविध जातींच्या कडुलिंबाच्या रोपांची आश्रमाला भेट दिली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला आश्रमातील साधिका, सेवकगण व स्थानिक गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कडुलिंबाच्या विविध प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हा कार्यक्रम पर्यावरण रक्षणासाठी समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला असून, वृक्षारोपणाच्या उपक्रमांमुळे आश्रम परिसरात हरित वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!