Join WhatsApp group

Ads

161 जागांसाठी हजारोंची झुंज; अकोला पोलीस भरती लेखी निकाल प्रसिद्ध

By Sarkar Maza

March 18, 2026 8:32 am

Ads

दिनांक १८ :

अकोला (प्रतिनिधी):
अकोला पोलीस दलातर्फे सन 2024-2025 या कालावधीतील पोलीस शिपाई पदांच्या 161 रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेचा निकाल 17 मार्च 2026 रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत 11 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत पात्र ठरलेल्या 2,314 उमेदवारांपैकी 2,281 उमेदवारांनी 15 मार्च 2026 रोजी अकोला शहरातील विविध केंद्रांवर लेखी परीक्षा दिली, तर 33 उमेदवार गैरहजर राहिले.

गुणांची आकडेवारी:
लेखी परीक्षेत सर्वाधिक 98 गुण तर किमान 3 गुण नोंदवले गेले. सरासरी गुण 58.71 असून मध्यम (Median) 61 आणि बहुलक (Mode) 64 आहे. यावरून बहुसंख्य उमेदवारांनी 60 पेक्षा अधिक गुण मिळवल्याचे स्पष्ट होते.

गुणांचे विश्लेषण:

  • 70 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 750 उमेदवार (सुमारे 33%)
  • 80 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 311 उमेदवार
  • 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे 436 उमेदवार
  • 20 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 28 उमेदवार, त्यापैकी 2 जणांनी 25 पेक्षा अधिक गुण मिळवले

या आकडेवारीवरून भरती प्रक्रियेत स्पर्धा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

पुढील प्रक्रिया:
पात्र उमेदवारांनी पुढील टप्प्यांसाठी आणि अधिक माहितीसाठी अकोला पोलीस दलाच्या अधिकृत https://akolapolice.gov.in/recruitment संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!