Join WhatsApp group

Ads

बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्याच घरात चोरी; एलसीबीने काही तासांत आरोपीला जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

August 3, 2026 9:36 am

Ads

अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमराल्ड टॉवर, तुकाराम चौक येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या काही तासांत छडा लावत शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीतील तब्बल ५ लाख रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी सुधीर वसंतराव धंद्रेते हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती.

याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १३१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयाची सुई फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या विनोद रमेशराव कोहर (वय ५१) याच्याकडे गेली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कुलूप नेऊन बनवली डुप्लिकेट चावी

तपासात धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने फिर्यादीच्या घराचे कुलूप गुपचूप नेऊन त्याची बाजारातून बनावट चावी तयार करून घेतली. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने त्या बनावट चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश करून चोरी केली.सोन्याची लगड आणि रोख रक्कम जप्तआरोपीने चोरीतील सोन्याचे दागिने अकोल्यातील निलरल ज्वेलर्स येथे विकल्याची कबुली दिली.

त्यानुसार पोलिसांनी ४१.०१० ग्रॅम वजनाची सुमारे ३.५० लाख रुपये किमतीची सोन्याची लगड तसेच दागिने विक्रीतून मिळालेली १.५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. अशा प्रकारे चोरीतील एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी, जप्त मुद्देमाल आणि तपासाची कागदपत्रे पुढील कारवाईसाठी खदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या पथकाने केली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (IPS), अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडी (IPS) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत API निलेश देशमुख, PSI माजिद पठाण तसेच एलसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Article

सामान्य जनतेचा विश्वास जिंकत जिंकत… ‘सरकार माझा न्यूज’ने गाठला १ लाख सक्रिय वाचकांचा मैलाचा दगड

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

मुर्तिजापूरमध्ये विकासापेक्षा गटबाजीला अधिक महत्त्व? नागरिकांचा सवाल

बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्याच घरात चोरी; एलसीबीने काही तासांत आरोपीला जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अण्णाभाऊ साठे जयंती रॅलीचे संस्थापक गजानन तायडे यांच्या सामाजिक विचारांचा वटवृक्ष; ‘तीक्ष्णगत’ संस्थेतून गरजू बालकांना अन्नधान्याची मदत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!