Join WhatsApp group

Ads

दारूच्या धंद्यासाठी पोलीसच मागत होते “हप्ता”! अनभोरा प्रकरणात बीट जमादार व रायटर ACB च्या जाळ्यात

By Sarkar Maza

March 13, 2026 4:38 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १३ :

अकोला जिल्ह्यात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनीच पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा गावात हा प्रकार घडला. येथे अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी तक्रारदाराकडे तब्बल तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या मागणीला कंटाळलेल्या तक्रारदाराने थेट अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचण्यापूर्वी केलेल्या पडताळणीत दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, चर्चेनंतर तीन हजारांवरून व्यवहार दोन हजार रुपयांवर ठरल्याचे देखील समोर आले.एसीबी पथक आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सज्ज झाले होते.

मात्र कारवाईची चाहूल लागताच दोन्ही आरोपी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे “दारूबंदी करायची की दारूच्या धंद्यावरच हप्ता घ्यायचा?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

अंभोरा गावात रस्त्याच्या कडेला झाडाखाली हा चित्र दिसून तिथे दारू विक्रीचा धंदा सर्रासपणे सुरू असून सडा पडलेला दिसत आहे आता प्रश्न असा उरतों की कायद्याचे रक्षण करायचे की अवैध धंद्याला संरक्षण द्यायचे? अनभोरा प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेलाच आता आरशात पाहण्याची वेळ आली आहे. आता पोलीस कर्मचारीच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या डोळ्यात धुळ फेकत ऑपरेशन प्रहारचा फाज्या उडवत आहे, या कारवाई वरून हे सिद्ध झालेले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!