Join WhatsApp group

Ads

-

हिरपूरच्या रस्त्यांची दुर्दशा; जबाबदारी बैलगाड्यांवर! प्रशासक सरपंच अमोल गढवेंच्या दाव्याने नवा सवाल

By Sarkarmzanews

August 31, 2026 2:34 pm

Ads

हिरपूर : हिरपूर येथे आज वार्षिक ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत गावातील विविध विकासकामे, समस्या तसेच इतर विषयांवर चर्चा होत असताना काही मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर ‘सरकार माझा न्यूज’ने ग्रामसभेचा आणि गावातील विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

हिरपूर गावातील सिमेंट रस्त्यांची अवस्था पाहता परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी रस्ते उखडलेले, काही ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही भागात रस्ता शोधावा लागेल अशी अवस्था असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावात सिमेंट रस्ते झाले की रस्त्यांचे अवशेष उरले? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘सरकार माझा न्यूज’ने नागरिकांच्या वतीने थेट प्रशासकीय सरपंच अमोल गढवे यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला.

अमोल गढवे हे यापूर्वीच्या कार्यकाळातही सरपंचपदावर होते. त्यामुळे गावातील रस्त्यांची सद्यस्थिती आणि त्यामागील कारणांबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित होते.

मात्र रस्त्यांची अशी दुरवस्था नेमकी कशामुळे झाली, असा प्रश्न विचारल्यानंतर प्रशासक सरपंच अमोल गढवे यांनी गावातील बैलगाड्यांमुळे रस्ते उखडल्याचा दावा केला. सरपंचांच्या या दाव्याने आता चर्चेला वेगळेच वळण मिळाले आहे.

बैलगाडी सिमेंट रस्ता कसा उखडते?

सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, रस्त्याची जाडी, बेस तयार करण्याची पद्धत आणि कामाची तांत्रिक गुणवत्ता यावर रस्त्याचे आयुष्य अवलंबून असते.अशा परिस्थितीत “बैलगाड्यांमुळे सिमेंटचे रस्ते उखडले” हा दावा खरोखरच तपासण्यासारखा आहे.

जर बैलगाड्यांमुळे रस्ते खराब झाले असतील, तर हिरपूरमधील सिमेंट रस्त्यांची डिझाइन क्षमता, बांधकामाचा दर्जा आणि तांत्रिक तपासणी नेमकी काय होती? हा प्रश्न उपस्थित होतो.

कारण गावातील बैलगाडी ही काही आजची नवी वाहतूक व्यवस्था नाही. ग्रामीण भागात बैलगाड्या वर्षानुवर्षे वापरल्या जात आहेत. मग बैलगाड्यांच्या वाहतुकीचा भार लक्षात घेऊन सिमेंट रस्ते बांधले गेले होते की नाही? हा मूलभूत प्रश्न आहे.

ग्रामसभेत चर्चा, पण रस्त्यांचा हिशेब कोण देणार?

ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले; मात्र हिरपूरच्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे केवळ कारण सांगून दुर्लक्ष करता येणार नाही.

रस्त्यांसाठी किती निधी मंजूर झाला?

कुठल्या योजनेतून निधी आला?

रस्ता बांधण्याचे काम कोणत्या ठेकेदाराने केले?

रस्त्याची जाडी आणि दर्जा काय होता?

कामाचे मोजमाप पुस्तिकेत (MB) काय नोंद आहे?

कामाची गुणवत्ता तपासली होती का?

आणि रस्ता इतक्या लवकर खराब झाला असेल तर जबाबदारी नेमकी कोणाची?या प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांना मिळणे आवश्यक आहे.

या प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांना मिळणे आवश्यक आहे.

‘सरकार माझा न्यूज’चा सवाल

हिरपूरच्या रस्त्यांची अवस्था जर बैलगाड्यांमुळे झाली असेल, तर सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणाबाबतही प्रश्न उपस्थित होतो.

बैलगाडीवर दोष देणे सोपे; मात्र रस्त्यासाठी खर्च झालेल्या सार्वजनिक पैशाचा दर्जेदार रस्ता ग्रामस्थांना मिळाला का? हा खरा प्रश्न आहे.ग्रामसभा संपली असली तरी हिरपूरच्या रस्त्यांचा प्रश्न संपलेला नाही.

आता ग्रामस्थांना केवळ कारण नको, तर रस्त्याच्या कामाचा कागदोपत्री हिशेब आणि प्रत्यक्ष गुणवत्तेची जबाबदारी हवी आहे.बैलगाड्यांमुळे रस्ता उखडला की रस्त्याची गुणवत्ता आधीच कमकुवत होती?

या प्रश्नाचे उत्तर आता ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Article

हिरपूरच्या रस्त्यांची दुर्दशा; जबाबदारी बैलगाड्यांवर! प्रशासक सरपंच अमोल गढवेंच्या दाव्याने नवा सवाल

आमदार पिंपळेंच्या मनगटावर बहिणींच्या प्रेमाची राखी; हर्षल साबळेंच्या उपस्थितीत जुळले स्नेहबंध

“गुटखा पकडला तेव्हा अन्न विभाग पुढे; आरोपी अटकेत आला तेव्हा पोलिस पुढे… आता सत्याच्या तपासात कोण पुढे जाणार?”

अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा मोठा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त

‘POCSO केस मागे घ्या, मग घर देतो’चा दबाव? नातेवाईकांनी घराबाहेर काढल्याचा कुटुंबाचा आरोप; ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट; अनिशचा विहिरीत मृत्यू, तरुणी बचावली अन् नंतर विषप्राशनाची माहिती”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!