Join WhatsApp group

Ads

७२० लिटरचा साठा जप्त, गुन्हाही दाखल; तरी इंधनाचा काळाबाजार थांबेना?

By Sarkarmzanews

August 19, 2026 10:45 pm

Ads

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कुरणखेड नवीन वस्ती बसथांब्याजवळील बाबा रामदेव हॉटेल-धाब्यावर विनापरवाना पेट्रोल व डिझेलचा साठा करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी धाब्याच्या मागील बाजूस असलेल्या टिनाच्या शेडमधून तब्बल ७२० लिटर पेट्रोल-डिझेल, अंदाजे ६४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पोलिसांना कुरणखेड नवीन वस्ती बसथांब्यासमोरील बाबा रामदेव धाब्यावर पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाब्यावर छापा टाकला असता चाँद खान नासीर खान पठाण (अकोला) आणि जहीर अहमद जहर अहमद (अकोला) हे दोघे उपस्थित आढळून आले.

पोलिसांना कुरणखेड नवीन वस्ती बसथांब्यासमोरील बाबा रामदेव धाब्यावर पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाब्यावर छापा टाकला असता चाँद खान नासीर खान पठाण (अकोला) आणि जहीर अहमद जहर अहमद (अकोला) हे दोघे उपस्थित आढळून आले.

धाब्याची झडती घेतली असता मागील बाजूस असलेल्या टिनाच्या शेडमध्ये चार निळ्या रंगांचे प्लास्टिक ड्रम आढळून आले. त्यापैकी दोन ड्रममध्ये प्रत्येकी १८० लिटर याप्रमाणे एकूण ३६० लिटर डिझेल, अंदाजे २८ हजार ८०० रुपये किमतीचे, तर अन्य दोन ड्रममध्ये एकूण ३६० लिटर पेट्रोल, अंदाजे ३६ हजार रुपये किमतीचे आढळून आले.

अशाप्रकारे एकूण ७२० लिटर पेट्रोल व डिझेल, अंदाजे ६४ हजार ८०० रुपये किमतीचा साठा विनापरवाना करून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर इंधन आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याबाबत दोन्ही संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून सुरक्षिततेच्या दृष्टीने तो नियमानुसार जमा केला.

अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शेखर कोद्रे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमातील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत आर्थिक फायद्यासाठी पेट्रोल-डिझेलचा अवैध साठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कारवाईनंतरही धाब्याच्या मागे कथित धंदा सुरू?

पोलिसांनी ७२० लिटर पेट्रोल-डिझेलचा अवैध साठा जप्त करून गुन्हा दाखल केला असतानाही धाब्याच्या मागील बाजूस पेट्रोल-डिझेलचा कथित व्यवसाय आजही पूर्ववत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतरही हा व्यवसाय सुरू असेल तर कारवाईचा धाक नेमका किती राहिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेट्रोल-डिझेल-इथेनॉलचा साठा; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

धाब्याच्या मागील बाजूस पेट्रोल, डिझेल किंवा इथेनॉलसारखे ज्वलनशील पदार्थ बेकायदेशीररीत्या साठवले जात असल्यास हा केवळ अवैध व्यवसायाचा विषय राहत नाही, तर सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनतो. अशा पदार्थांमधून निर्माण होणारी ज्वलनशील वाफ हवेत मिसळून ठिणगी, उघडी आग किंवा विद्युत स्पार्कच्या संपर्कात आल्यास मोठी आग किंवा स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीत उद्या चुकून एखादी अप्रिय घटना घडली, आग लागली किंवा मोठी दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे. घटना घडल्यानंतर पंचनामा, गुन्हा, तपास आणि कारवाई करण्यापेक्षा घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक नाही का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘ऑपरेशन प्रहार’नंतरही पुन्हा तोच प्रकार?

एकीकडे ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध इंधन साठ्यावर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते, तर दुसरीकडे त्याच ठिकाणी कारवाईनंतरही कथित व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे कारवाईनंतर संबंधित ठिकाणी पुन्हा अवैध साठा किंवा विक्री सुरू आहे का, याची तपासणी कोण करणार? हा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे.

संबंधित पोलीस, महसूल, पुरवठा तसेच अग्निशमन यंत्रणांनी या ठिकाणी तातडीने संयुक्त तपासणी करून, अवैध इंधन साठा किंवा विक्री आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच कारवाई करणे अधिक महत्त्वाचे नाही का?

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मुर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस अंमलदार सुदीप राऊत व शेखर कोद्रे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!