Join WhatsApp group

Ads

अकोल्याचे १० बॉक्सर्स (०६ मुले/०४ मुली) १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धासाठी, बंगळुरु (कर्नाटक) येथे रवाना

By Sarkarmzanews

February 5, 2026 9:27 am

Ads

शालेय राष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीर सातारा येथे आयोजित

दिनांक ०५ : अकोला : स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा दि. ०५ ते ०९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ग्रेट बंगळुरु (कर्नाटक) येथे आयोजित १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेकरिता अकोला क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या १० बॉक्सरांची निवड झाली आहे. मुलांमध्ये विवेक तायडे याची निवड -४६ कि. वजनगटात, रविंद्र पाडवी याची निवड ४९-५२ कि. वजनगटात, चेतन अंभोरे याची निवड ५६-६० कि. वजनगटात, रिझवान शाह याची निवड ६०-६४ कि. वजनगटात, रेहान हुसैन याची निवड ६४-६९ वजनगटात तर रुषीकेश चव्हाण याची निवड ७५-८१कि. वजनगटात झाली आहे. तसेच मुलींमध्ये समिक्षा सोळंके हिची निवड ४५-४८ कि. वजनगटात, श्रध्दा खोब्रागडे हिची निवड ४८-५१ कि. वजनगटात, भक्ती चुंगडे हिची निवड ७५-८१ कि. वजनगटात तर वेदश्री गोतमारे हिची निवड +८१ कि. वजनगटात झाली आहे.

वरील सर्व बॉक्सर्स हे सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर मध्ये सहभागी खेळाडु आहेत. सदर स्पर्धेत क्रीडा प्रशिक्षक म्हणुन श्री गजानन कबीर काम पाहत आहेत. उक्त सर्व बॉक्सर खेळाडुंना आंतरराष्ट्रीय बॉक्सींग कोच व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

उक्त निवड झालेल्या खेळाडुंना मुर्तीजापुरचे मा. आमदार श्री हरीष पिंपळे, मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, भा.प्र.से., क्रीडा विभाग मा. आयुक्त पुणे श्रीमती शितल तेली, क्रीडा विभाग सहसंचालक श्री सुधिर मोरे, उपसंचालक पुणे मा. संजय सबनीस, उपसंचालक अमरावती विभाग श्री शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट तसेच अकोला चे जनप्रतीनिधी क्रीडाप्रेमी यांनी विजेत्या स्पर्धकांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!