Join WhatsApp group

Ads

अकोला जिल्ह्यात तलवारबाजी व रस्सीखेच संघाच्या निवड चाचण्या ६ सप्टेंबरला

By Sarkarmzanews

September 3, 2026 11:00 am

Ads

अकोला : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी (फेन्सिंग) असोसिएशन व अमरावती जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान अमरावती येथे ३४ वी ज्युनिअर मुले-मुली राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत अकोला जिल्ह्याचा संघ सहभागी होणार असून, त्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानप्रकाश विद्यालय, पिंजर, ता. बार्शीटाकळी येथे होणार आहे.

या निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रस्सीखेच संघाचीही निवड चाचणी

दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्सीखेच असोसिएशन व परभणी जिल्हा रस्सीखेच असोसिएशनच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान सेलू, जि. परभणी येथे २७ वी सब-ज्युनिअर मुले-मुली तसेच सिनीअर महिला व मिक्स ४+४ राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी अकोला जिल्हा रस्सीखेच संघाची निवड चाचणी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नोबेल हायस्कूल, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे.या निवड चाचणीतून निवड झालेला संघ राष्ट्रीय स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

इच्छुक खेळाडूंनी सुनिल बैस, प्रा. सुभाष ठाकरे, अमित मनवर व विवेक भागवत यांच्याशी संपर्क साधून निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे सचिव संजय इसाळकर व कोषाध्यक्ष अजिंक्य तिडके यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!