Join WhatsApp group

बचपन व अकॅडमी हाईटस जिल्ह्यासाठी भूषण वार्षिक उत्सवात पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचे गौरवोद्गार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर प्रतिनिधी : मुर्तिजापूर येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असलेल्या, जिल्ह्यातील सर्वात भव्य दिव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या बचपन व अकेडमि हाईटस या सी.बी.एस.सी. मान्यता प्राप्त शाळेचे कार्य केवळ शहरासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी वार्षिकोत्सवा दरम्यान उद्घाटनाप्रसंगी काढले.

अतिशय कल्पक,रोमांचकारी व अद्भुत अशा कलाविष्काराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वार्षिकोत्सव म्हणजे आपल्या कौशल्याचे सादरीकरण असून त्यातून व्यवस्थापन,शिस्त,समन्वय,अभिनय,नृत्य, साहस,संवाद,साहित्य,संस्कृती आदि कौशल्यांचा विकास होतो.

भव्य दिव्य अशा कार्यक्रमांमधून नव्या रोजगारांच्या संधी तथा करिअरसाठी दिशा प्राप्त होतात, असे प्रतिपादन वार्षिकोत्सवाचे उद्घाटक तथा मुख्य अतिथी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष अशोक दर्याणी यांच्यासह न्यायाधीश आसिफ तांबोळी.

प्रमुख वक्त्या कोठारी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य सौ. अंजली कडलस्कर, तहसीलदार सौ. शिल्पा बोबडे, पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, पोलीस निरीक्षक अजित जाधव ,संचालिका कु.रिया दर्याणी आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे ,बचपन अकॅडमी हाईटस प्राचार्य डॉ.प्रशांत धर्माधिकारी.

स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगावच्या प्राचार्या सौ. प्रचिती धर्माधिकारी, सौ.रिया तिडके, मुख्य समन्वयक अबिन सी.राज,सेंट झेवियरच्या मुख्याध्यापिका सौ संध्या दुबे, लिटिल फ्लावरच्या मुख्याध्यापिका सौ रेणुका कांबे, उद्योजक दीपक शर्मा, आशिष पवित्रकार.

पत्रकार दिलीप देशमुख, अविनाश बेलाडकर, प्रा.बंडू जोशी , दीपक अग्रवाल,विलास नसले, अजय प्रभे, अनिल अग्रवाल,गौरव अग्रवाल,जयप्रकाश रावत, निलेश सुखसोहळे, संजय उमक, रोहित सोळंके, मिलिंद जामनिक ,यांची मुख्य उपस्थिती होती.

प्रा.डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी विद्यार्थी व पालकांना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले वार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यशोगाथा , कांतारा , मोबाइल चे दुष्परिणाम , जुडो – कराटे प्रात्यक्षिके इत्यादी कलाविष्कार सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकूण ९ विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर वार्षिक उत्सवास यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!