Join WhatsApp group

Ads

Crime News: गर्लफ्रेंडने दरवाजा न उघडल्यामुळे गोळीबार : एक तासाच्या थरारक पाठलागानंतर अखेर…

By Sarkarmzanews

January 18, 2025 2:37 pm

Ads

दिनांक १८ : न्युज डेस्क : लातूर : आंबेजोगाई येथे गर्लफ्रेंड ने दार न उघडल्यामुळे एका तरुणाने खिडकीतून गोळीबार केल्याची घटना काल घडली होती. यामधील आरोपी गणेश चव्हाण गोळीबाराची घटना करून लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथे दबा धरून बसला होता. काल सकाळी गणेश पंडितराव चव्हाण या तरुणाने आंबेजोगाई येथील एका घरावर गोळीबार केला होता. त्यानंतर बीड पोलीस त्या तरुणाचा शोध घेत होते.

बीड जिल्ह्याला लागून असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेनापुर पोलीस यांना त्याबाबत माहिती मिळाली. गोविंद नगर शिवारात आरोपी आल्याचे समजताच शोधा शोध सुरू झाली. गणेश पंडितराव चव्हाण हा स्कुटी वरून गोविंद नगर शिवारात फिरत असल्याची माहिती मिळाली. आणि पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर येत असल्याचे लक्षात आल्यावर गणेश चव्हाण याने स्कुटी रस्त्यात टाकून शेतात पळ काढला. पोलिसांनीही शेतात त्याचा पाठलाग सुरू केला. एक तासापेक्षा अधिक काळ त्याचा पाठलाग केल्यानंतर गणेश चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. पळत असताना गणेश चव्हाण याची गावठी पिस्तूल पोलिसांना सापडली. लातूर पोलिसांनी गणेश चव्हाण यास ताब्यात घेतलं त्याचवेळी, आंबेजोगाई भागातून आलेले पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं पुढील कारवाई सुरू आहे.


गर्लफ्रेंडने दरवाजा न उघडल्यामुळे गोळीबार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीशी प्रियकर गणेश पंडित चव्हाणचे (वय २४) प्रेमसंबंध होते. मात्र, गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून संबंधित युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यानंतर गणेश चव्हाणने युवती व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच रागातून तो आंबेजोगाईमध्ये आला होता. यावेळी त्याने थेट युवतीच्या घरी जात तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा कोणीच न उघडल्याने गावठी कट्ट्याने, त्याने खिडकीतून गोळीबार केला. मात्र, यावेळी कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीमध्ये असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे. बीड जिल्ह्यामधील धक्कादायक घटनांमध्ये मालिका सुरुच आहे.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!