Join WhatsApp group

गरीब घरातून विधानसभे कडे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सहकार्यांनी मिळून देशाचे संविधान लिहिले व या देशातील प्रत्येक समाजाला व प्रत्येक घटकाला अर्पण केले. त्या संविधाना वर आज देश चालत आहे . त्यामध्ये देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा असे काही नियम कायदे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. संविधाना मध्ये लोकशाही ला सर्वोच्च स्थान देण्यात आले. आणि देशातील वंचित बहुजनांना आरक्षण देण्यात आले.

शिका , संघटीत व्हा आणि आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजनांना आवर्जून सांगितले . त्या मधून बहुजन वर्गाने प्रेरणा घेतली आणि आज देशाचा सर्वोच्च पदापर्यंत वंचित वर्ग विराजमन आहे.

अकोल्यातील भिम नगर येथे राहणारे एक गरीब व्यक्ती आपल्या छोट्याशा कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी गवंडी काम करत होते, तसेच कसे बसे आपले घर चालवून बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार मुलांच्या शिक्षणावर जास्त भर देत असत . कर्म चांगले असले कि त्याचे फळ नक्की भेटते . असेच फळ ह्या गवंडी काम करणा-या व्यक्तीला मिळत गेले व मजुरी ते ठेकेदार आणि ठेकेदार ते बिल्डर त्यांचा व्यावसायिक प्रवास घडला.

पैसा कमविताना बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा त्यांचा डोक्यात असे . समाजाचासाठी काही तरी करावं या साठी सम्यक संबोधि सामाजिक संस्थेची त्यांनी स्थापना केली व सामाजिक कार्याला गती दिली. ते व्यक्ती म्हणे ग्यानेश्वर वाघमारे !

परिवर्तन संसाराचा नियम –

परिवर्तन संसारचा नियम आहे ही फक्त म्हण नसून शास्वत सत्य .

आपल्या पित्याचा वारसा पुढे घेऊन जाणे हे प्रत्येक पुत्राचा कर्तव्य असतो.
सुगत वाघमारे यांनी सम्यक संबोधी संस्थे पासून तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी कडे तो वारसा वाढविला . तसेच ठेकेदारीपासून तर बिल्डरशिप पर्यंत व्यवसाय पोहोचविला . पित्याने जे संस्कारांचे बीज पेरलेले होते त्याचा वटवृक्ष झाल्याचे आज बघायला मिळत आहे.

अकोला शहरापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात करून त्यांनी आज संबंध महाराष्ट्रात आपला बांधकाम व्यवसाय नेऊन ठेवला आहे.

तसेच संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य डॉ . सुगत वाघमारे यांनी केले आहे 186 युवकांना , महिलांना शासनाची मदत घेऊन आपल्या संस्थेच्या वतीने व्यवसाय उभारून दिले व अनेक व्यवसाय स्वतःच्या जोरावर त्यांनी सुरू केले . त्यातून हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.

रुग्णसेवा, रुग्णवाहिका, व्यवसायिकांना मदत करणे असे अनेक या संस्थेचे वेगवेगळे कार्य असून आजपर्यंत आपल्या संस्थेची त्यांनी कुठे पण जाहिरात केली नाही.

का बरं राजकारण?

व्यवसाय करताना गल्ली ते दिल्ली अनेक राजकारणी व दिग्गज लोकांन सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. निकटवर्तीय सहकर्यांनी , परिवारातल्या लोकांनी तसेच समाजातील लोकांनी राजकारणात येण्यासाठी त्यांची समजूत घातली , पण त्यांना अपयश आले . त्यांचे म्हणणे असे होते की तुझा सामाजिक फायदा आज जे पाच ते दहा हजार लोकांना संस्थेमार्फत होत आहे तोच फायदा निवडणूक लढली तर लाखो लोकापर्यंत पोहोचू शकतो . या विषयावर अखेर वंचित पक्षाचा कार्यकर्त्यांना समजूत घालण्यात यश आले व वंचित पक्षाचा गड या निवडणुकीत त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

सामाजिक सेवा , क्रीडा , रुग्णसेवा , उद्योगधंदे , स्वच्छ पाणी सुंदर शहर असे अनेक मुद्दे घेऊन मुर्तीजापुर – बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघात निवडणूकीमध्ये उमेदवार म्हणून त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.

अनुसूचित जातीचे मतदान इथे जास्त असून आज पर्यंत वंचितचा उमेदवारला या मतदारसंघाला मिळाला नसून या वेळेस सुगत वाघमारे 24 कॅरेट खरे उमेदवार आहेत अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे तर डॉ. सुगत वाघमारे व पक्षाने यावेळी वंचितला दोन नंबर वरून एक नंबरला घेऊन जाण्याचा पवित्र उचलला आहे . पक्षांतर्गत गटबाजी आणि अनेक राजकीय द्वेष विसरुन कनिष्ठ ते वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागले आहेत . निवडणुकीचा जोश सध्या वंचितच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा चहेर्यावर दिसून येत आहे.

कोणत्या पक्षा वर अथवा उमेदवारावर टीका न करता त्यांची प्रचार व्यवस्थापन खूप सुरळीत नियोजन पद्धतीने सुरु आहे आता या मेहनतीला किती यश मिळतो हे पाहणे रोचक ठरणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!