Join WhatsApp group

Ads

---

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान

By Sarkarmzanews

January 10, 2025 10:00 am

Ads

अकोला : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, पेरू, संत्रा, कागदी लिंबू, मोसबी, सीताफळ, आवळा, डाळिंब आदी फळपीक लागवडीचा समावेश आहे. त्यात भरघोस अनुदान उपलब्ध असून.

वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. फळपिकाला तीन वर्षांत अनुक्रमे ५०, ३० व २० याप्रमाणे अनुदान वाटप होते. तीन वर्षांत एकूण देय अनुदान आंबा पीकासाठी ७१ हजार ९९७ रू., पेरू कलमांसाठी ७७ हजार ६९२ रू. संत्रा- मोसंबीसाठी ८९ हजार २७५ रू.. कागदी लिंबू रोपे ७२ हजार ६५५ रू., सीताफळ कलमे ९१ हजार २५१ रू. आवळा ६३ हजार ६४० रू. व डाळिंबासाठी १ लक्ष २६ हजार ३२१ रू. अनुदान आहे. जिल्ह्यातील ओलिताची सोय असणा-या शेतक-यांना योजनेचा लाभ मिळतो कृषी विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.i n या संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक आहे. वैयक्तिक शेतक-यांना लाभ घेता येईल.

संकेतस्थळावर पूर्वसंमतीसाठी घटकांतर्गत लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!