Join WhatsApp group

Ads

“इंग्रजीच्या धड्यांसोबत विद्यार्थ्यांना दिला आत्मविश्वास; सागर आखरे सरांचा मानद डॉक्टरेटने गौरव”

By Sarkarmzanews

September 6, 2026 3:59 pm

Ads

मूर्तीजापूर : शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम ठरावे, या दृष्टिकोनातून सातत्याने कार्य करणारे सागर सुखदेवराव आखरे सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना इंग्रजी भाषा शिक्षण व संप्रेषण विज्ञान विषयातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

या उल्लेखनीय सन्मानाबद्दल मूर्तीजापूर शहरातील मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून स्पोकन इंग्लिश, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास या क्षेत्रात आखरे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

विशेषतः ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबतचा संकोच दूर करून त्यांना आत्मविश्वासाने संवाद साधण्यासाठी सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आखरे अँड मंडलापुरे फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देण्याची त्यांची कार्यपद्धती अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटी, लॉस एंजल्स, कॅलिफोर्निया यांच्या वतीने त्यांना मानद डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या सन्मानामुळे आखरे सरांच्या शैक्षणिक कार्याला विशेष अधोरेखित मिळाली आहे.

मित्रपरिवाराकडून सत्कार

मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल मूर्तीजापूरातील मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सागर आखरे सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राम जोशी, वृत्तपत्राचे संपादक सचिन देशपांडे आणि पत्रकार विलास सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आखरे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करीत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांना दिशा देणारे शिक्षक म्हणून त्यांचे कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पुस्तक नव्हे, तर आत्मविश्वास देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाचा सन्मान, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या गौरवामुळे मूर्तीजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातही समाधान व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!